लॉकडाऊनमुळे कुटुंबापासून दूर अडकून पडलाय 'अपना भिडू', पण सोबतीला आहेत या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 10:10 AM2020-04-13T10:10:00+5:302020-04-13T10:11:27+5:30

लॉकडाऊनमुळे बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत.

jackie shroff stuck at khandala farmhouse corona lockdown-ram | लॉकडाऊनमुळे कुटुंबापासून दूर अडकून पडलाय 'अपना भिडू', पण सोबतीला आहेत या गोष्टी

लॉकडाऊनमुळे कुटुंबापासून दूर अडकून पडलाय 'अपना भिडू', पण सोबतीला आहेत या गोष्टी

googlenewsNext
ठळक मुद्दे2012 साली जॅकीने खंडाळ्यातील हे फार्म हाऊस खरेदी केले होते.

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. सलमान खान त्याच्या फार्म हाऊसवर अडकलाय, अभिनेता मनोज वाजपेयी व दीपक डोबरियालाही उत्तराखंडात अडकून पडले आहेत. आता तुमचा आमचा जग्गू दादा अर्थात जॅकी श्रॉफ हाही लॉकडाऊनमुळे अडकलाय. होय, जग्गू दादा घरापासून दूर खंडाळ्याच्या आपल्या फार्म हाऊसवर अडकून पडला आहे. त्याच्यासोबत कुटुंबातील एकही सदस्य नाही़ म्हणजेच जॅकी एकटा आहे.

फार्म हाऊसवर का गेला होता जॅकी
जॅकीचे कुटुंब मुंबईत आहे तर लॉकडाऊनमुळे जॅकी फार्म हाऊसवर. जॅकीची पत्नी आयशा हिने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला. तिने सांगितले की, जॅकी खंडाळ्याच्या फार्महाऊसवर काही नवी रोपटी लावायला आणि पावसाळ्यापूर्वीची काही कामे करण्यासाठी गेला होता. पण लॉकडाऊनमुळे तो तिथेच अडकून पडला. 

त्याचा स्टाफ त्याच्यासोबत आहे. सोबतीला ताजी हवा, स्वत:ची अशी स्पेस, स्वत: पिकवलेल्या ताज्या भाज्या, फळे असे सगळे त्याच्यासोबत आहे. व्हिडीओ कॉलद्वारे आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. जॅकी फार्महाऊसवर एकटा आहे. पण तो अगदी मजेत आहे. सुरक्षित आहे.

2012 साली जॅकीने खंडाळ्यातील हे फार्म हाऊस खरेदी केले होते. लग्नाच्या 25 व्या वाढदिवशी त्याने हे फार्महाऊस पत्नीला गिफ्ट दिले होते. जॅकीला बागकामाचा छंद आहे. फावला वेळ मिळाला की, जॅकी त्याच्या फार्महाऊसवर हा छंद पूर्ण करण्यासाठी निघतो. येथे त्याने वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत.

Web Title: jackie shroff stuck at khandala farmhouse corona lockdown-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.