ठळक मुद्देकृष्णाला टॅटू काढण्याचा छंद आहे.  शरीराच्या अनेक भागांवर तिने टॅटू गोंदवले आहेत.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफची लेक आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ हिने बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहणे पसंत केले. पण म्हणून ती कमी ग्लॅमरस नाही. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. सध्या कृष्णा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहेत. यास्रदरम्यान तिचे व तिच्या बॉयफ्रेन्डचे काही बोल्ड फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत कृष्णा  ब्लॅक बिकिनीत आहे आणि बॉयफ्रेन्ड एबन हायम्सचा हात तिच्या हातात आहे.


कृष्णा रिअल लाईफमध्ये कमालीची बोल्ड आहे. याआधी बॉयफ्रेन्डला किस करतानाचे तिचे फोटो व्हायरल झाले होते. नुकताच एबनने त्याच्या इन्स्टास्टोरीवर कृष्णाचा एक फोटो शेअर केला  होता. त्या फोटोला त्याने wifey अर्थात पत्नी म्हणून टॅग केले होते.


या फोटोवरून कृष्णा व एबन लवकरच विवाहबंधनात अडकणार असे मानले जात आहे. दोघांनी साखरपुडा केल्याचीही चर्चा आहे.

 एकंदर काय तर कृष्णाचा रोमान्स जोरात आहे. एबन हा एक ऑस्ट्रेलियन बॉस्केटबॉल प्लेयर आहे. त्याच्याकडे ऑलिया, इस्राईल व भारताचे नागरिकत्व आहे. एका ताज्या मुलाखतीत कृष्णाने तिच्या आयुष्यात एक व्यक्ती असल्याची कबुली दिली होती. मी ज्याच्यासोबत आहे, आनंदी आहे. मला काहीही लपवण्याची गरज नाही, असे ती म्हणाली होती. यानंतर सोशल मीडियावर एबनसोबतचे अनेक फोटो तिने शेअर केले होते.

25 वर्षांची कृष्णा सोशल मीडियावर अ‍ॅॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. टायगर वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने अ‍ॅक्शन स्टार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख बनवली. पण जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा मात्र कायम पडद्यामागे राहणे पसंत करते.

असे म्हणतात की, करण जोहरने 2012 मध्ये ‘स्टुडंट ऑफ इअर’साठी कृष्णाला ऑफर दिली होती. पण कृष्णाने ही ऑफर नाकारली आणि ही भूमिका नंतर आलिया भटच्या पदरात पडली. कृष्णाला टॅटू काढण्याचा छंद आहे.  शरीराच्या अनेक भागांवर तिने टॅटू गोंदवले आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Jackie shroff daughter krishna shroff bold pictures with boyfriend going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.