आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या टीमचा सामना नुकताच पार पडला. यावेळी शेवटच्या बॉलिंगच्या वेळी दोन रनची गरज होती आणि अगदी सहजतेने मुंबई इंडियन्सने मिळविले. कर्णधार पोलार्डने अल्जारी सोजेफसह(नाबाद १५) ३.४ षटकांत ५४ धावांची भागिदारी करत मुंबई इंडियन्स संघाच्या विजयाचा पाया रचला. पोलार्डच्या दमदार खेळीच्या जोरावर  मुंबई इंडियन्सने पंजाबचा तीन विकेटने पराभव केला. 

मुंबईच्या विजयात पोलार्डने महत्वाची भूमिका बजावली. पोलार्डच्या या कामगिरीचे सगळीकडून खूप कौतूक होत आहे. इतकेच नाही तर बॉलिवूडचा गली बॉय रणवीर सिंगने देखील त्याचे सोशल मीडियावर कौतूक केले आहे. रणवीरने त्याचा उल्लेख मॉन्स्टर असा केला आहे. पोलार्डची खेळी पाहून रणवीर खूपच प्रभावित झाला आहे.


रणवीरने ट्विट केले की, पोलार्ड एक मॉन्स्टर आहे. जबरदस्त फलंदाजी!!!, भन्नाट कॉन्फिडंस!!!, सर्वश्रेष्ठमध्ये सर्वोत्तम!!!, चांगला कर्णधार!!!, प्रेरणादायी नेतृत्व!!!. प्रतिभाशाली!!! 

रणवीर सिंग ८३ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती कपिल देवची भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या रणवीर या भूमिकेची तयारी करतो आहे.

 १९८३चा विश्वचषक भारतीय क्रिकेट टीमने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. या सिनेमातून कपिल देव यांची मुलगी दिग्दर्शनात पदार्पण करतेय. आमिया या सिनेमाचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहे.

 '८३'ची टीम शूटिंग करिता लंडनसाठी १५ मे रोजी रवाना होणार आहेत

Web Title: IPL 2019: Pollard's storm won Mumbai Indians, while Ranveer Singh gave him the title of 'Monster'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.