Hyderabad rape case Bollywood annoyed over murder case after raping doctor girl | डॉक्टर तरुणीवर बलात्कारानंतर हत्या प्रकरणावर संतापले बॉलिवूडकर
डॉक्टर तरुणीवर बलात्कारानंतर हत्या प्रकरणावर संतापले बॉलिवूडकर

हैदराबादमध्ये बुधवारी पीडित २६ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आले आहे.  या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. मात्र या प्रकरणानंतर संपूर देशातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. इतकंच नाही या घटनेवर बॉलिवूडचे सेलिब्रेटीदेखील संतापले आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. इतर बलात्कार प्रकरणाची आठवण करून देत अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे.

या प्रकरणावर संताप व्यक्त करत अभिनेता अक्षय कुमारनं ट्वीट केलं की, हैदराबाद बलात्कार प्रकरण असो तमिळनाडू असो किंवा मग रांचीतील कायदा शाखेच्या विद्यार्थीनीवर झालेला सामुहिक बलात्कार असो. आपण एक समाज म्हणून प्रत्येक दिवशी हरत आहोत. सर्वांनाच हादरवून सोडणाऱ्या निर्भया प्रकरणाल ७ वर्षे होऊन गेली आहेत. मात्र आपली नैतिकता अद्याप बदलेली नाही. आता देशात कडक नियम आणि कायद्यांची गरज निर्माण झाली आहे. हे सर्व बंद होणं गरजेच आहे.

अभिनेता फरहान अख्तरनं लिहिलं, त्या लोकांनी महिला डॉक्टरसोबत जे केलं ती गोष्ट आपल्याला याची आठवण करुन देते की याआधी अशा घटनांबाबत आपण लगेचच सुनावणी आणि न्याय मिळवून न दिल्यानं आपल्या सोसायटीला आपणच अशाप्रकारे असुरक्षित केलं आहे. या दुःखद घटनेत मी त्यांच्या कुटुंबासोबत आहे.

अभिनेत्री शबाना आझमी यांनी ट्विट केलं की,भयानक, क्रुरता. या क्रुर लोकांना शिक्षा मिळालीच पाहिजे. मला तिच्या कुटुंबासाठी वाईट वाटलं आणि याचं पण दुःख आहे की आपल्या समाजातील काही भागात असं का घडत आहे.

यामी गौतमने ट्विट केलं की, राग, दुःख व सदमा...जोरदार हंगामे व जागरूकतेनंतरही असे अमानवीय व अकल्पनीय अपराध महिलांच्या विरोधात कसे काय होऊ शकतात. या राक्षसांना कायदे व शिक्षेती भीती वाटत नाही का? आपण व्यवस्थेच्या रुपात आणि समाजाच्या रुपात कुठे चुकतो आहोत ?

अभिनेता अनूप सोनीने लिहिलं की, आपण एक आणखीन मुलगी, बहिण व मैत्रीणीला हरपलो आहे. मला माहित आहे की मला यासाठी खूप ज्ञान मिळणार आहे. मात्र यासारख्या गुन्ह्यांना कॅपिटल पनिशमेंट मिळाली पाहिजे. जोपर्यंत शिक्षा कठोर बनत नाही, आम्ही सुधारणार नाही...आपण असा एक समाज बनलो आहे.

Web Title: Hyderabad rape case Bollywood annoyed over murder case after raping doctor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.