Hrithik Roshan Birthday : हृतिक व सुजैन यांच्यात नक्की चाललंय तरी काय? घटस्फोटानंतरही का दिसतात एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 08:00 AM2020-01-10T08:00:00+5:302020-01-10T08:00:07+5:30

Hrithik Roshan Birthday : 'ग्रीक गॉड' हृतिक रोशनचा आज वाढदिवस.

hrithik roshan birthday special actor relationship with ex-wife sussanne khan | Hrithik Roshan Birthday : हृतिक व सुजैन यांच्यात नक्की चाललंय तरी काय? घटस्फोटानंतरही का दिसतात एकत्र?

Hrithik Roshan Birthday : हृतिक व सुजैन यांच्यात नक्की चाललंय तरी काय? घटस्फोटानंतरही का दिसतात एकत्र?

googlenewsNext
ठळक मुद्देहृतिक व सुजैन दोघांनी लग्नाच्या १४ वषार्नंतर २०१४ साली घटस्फोट घेतला होता.

तरूणाईच्या गळ्यातील ताईत हृतिक रोशनचा आज वाढदिवस. हृतिक त्याच्या चित्रपटासोबतच एक्स-वाईफ सुजैन खानमुळे चर्चेत असतो. सुजैन खानसोबत हृतिकचा घटस्फोट झालाय, ही आता नव्याने सांगण्याची गोष्ट नाही. घटस्फोटानंतरही हृतिक व सुजैनच्या नात्यात कुठल्याही प्रकारची कटुता आलेली नाही, ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. मुलांचा वाढदिवस असो किंवा घरातल्या पार्ट्या असो, डिनर डेट, न्यू ईयर पिकनीक  सगळीकडेच हृतिक व सुजैन एकमेकांसोबत दिसतात. घटस्फोट झालेल्या या कपल इतक्यांदा एकत्र पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. पण  यामागे एक खास कारण आहे.

होय, एका मुलाखतीत हृतिकने स्वत: यामागचे कारण सांगितले होते. या मुलातखती हृतिक सुजैनबद्दल भरभरून बोलला होता. ‘आमचा घटस्फोट झालाय, त्यामुळेच तू तुझ्या एक्स- वाईफसोबत इतक्या सहजपणे कसा राहू शकतोस? असा प्रश्न मला अनेकजण विचारतात. खरे सांगायचे तर आमच्या दोन्ही मुलांसाठी आम्ही हे करतो.  

आमच्या नात्यात कुठल्याही प्रकारची कटुता येऊ नये, हा आमचा प्रयत्न असतो.   आजही आम्ही  एकमेकांचा प्रचंड आदर करतो.  आपल्या मॉम-डॅडमध्ये मतभेद आहेत. पण प्रॉब्लेम नाहीत, हे माझ्या मुलांना कळावे. आपल्या आईला प्रेम आणि आदर मिळतो, हे त्यांना कळावे, हा माझा प्रयत्न असतो. विभक्त झालो असलो तरी कुटुंब म्हणून आपण सोबत आहोत, हे मुलांच्या मनावर बिंबवण्याचा आमचा प्रयत्न असतो. सुजैनसोबतच्या नात्यात संतुलन ठेवणे कठीण आहे. पण मुलांच्या आनंदासाठी, त्यांच्या शांतीसाठी आम्ही सतत प्रयत्न करतो, असे हृतिकने या मुलाखतीत सांगितले होते.

या सगळ्यामुळेच घटस्फोट झाला असला तरीदेखील हृतिक व सुजैन आजही फ्रेंड्ससारखे भेटतात.आपल्या मुलांसोबत वेळ व्यतित करतात. मुव्ही व डिनर डेटवर एकत्र जातात. या दोघांनी लग्नाच्या १४ वषार्नंतर २०१४ साली घटस्फोट घेतला होता.

Web Title: hrithik roshan birthday special actor relationship with ex-wife sussanne khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.