'माझ्या ड्रिंकमध्ये तो काहीतरी मिसळवून द्यायचा', कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 03:05 PM2020-08-28T15:05:48+5:302020-08-28T15:06:18+5:30

मी लहान असताना माझ्या मेंटॉरने मला खूप त्रास दिला आहे. मेंटॉर माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळायचा आणि ते ड्रिंक मला प्यायला द्यायचा, असा धक्कादायक खुलासा कंगनाने केला आहे.

‘He used to mix something in my drink’, is the shocking revelation of Kangana Ranaut | 'माझ्या ड्रिंकमध्ये तो काहीतरी मिसळवून द्यायचा', कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा

'माझ्या ड्रिंकमध्ये तो काहीतरी मिसळवून द्यायचा', कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. सुशांत सिंग राजपूतचे निधन झाल्यापासून कंगना सातत्याने सोशल मीडियावर घराणेशाही व गटबाजीविरोधात निशाणा साधत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुशांतप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर कंगनानेसुद्धा तिच्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर करायला सुरुवात केली आहे. कंगनाने ट्विट करत खुलासा केला आहे की तिला कसे ड्रग्स दिले आणि इंडस्ट्रीत ड्रग्सचा वापर कसा केला जातो.   

कंगना राणौतने ट्विट केले की, मी लहान होते तेव्हा माझ्या मेंटॉरने मला खूप त्रास दिला आहे. माझा मेंटॉर माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळायचा आणि ते ड्रिंक मला प्यायला द्यायचा. तो मला पोलिसांकडे जाण्यापासून सुद्धा रोखत होता.

तिने पुढे सांगितले की, मी जेव्हा चित्रपटात काम करायला सुरुवात केली तेव्हा मी मोठ्या पार्ट्यांमध्ये जायचे. यावेळी मी ड्रग्सची खूप भयावह जग पाहिले आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोकेनचा सर्वात जास्त वापर केला जातो. मी  जेव्हा पार्ट्यांमध्ये जायची तिथे हे ड्रग पार्टीमध्ये अनेकवेळा फ्री दिले जायचे. मात्र, नंतर त्यामध्ये एमडीएमएचे क्रिस्टल मिसळून दिले जावू लागले.

कंगनाने तिला त्रास देणारा तो मेंटॉर कोण होता? याचा उलगडा केलेला नाही. तसेच कंगनाने बॉलिवूड इंडस्ट्रीतील ड्रग्जच्या विळख्याविषयी माहिती देत भरपूर आरोप केले आहेत. मात्र, यामध्ये तिने कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही.

Web Title: ‘He used to mix something in my drink’, is the shocking revelation of Kangana Ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.