ठळक मुद्देराणा केवळ एक अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.

बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती याचा आज (१४ डिसेंबर) वाढदिवस. १४ डिसेंबर १९८४ रोजी जन्मलेला त्याच्या फिजिक आणि अभिनयासाठी ओळखला जातो. आज जाणून घेऊ यात, त्याच्याबद्दल काही खास गोष्टी...

राणा केवळ एक अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे. कोणिक इन्स्टिट्यूट आॅफ इमेजिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीमधून त्याने फोटोग्राफीचा कोर्स केला आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर राणाने चेन्नईत अनेक डॉक्युमेंट्री व अ‍ॅड फिल्म्सचे दिग्दर्शन केले. यानंतर हैदराबादेत येऊन तो आपल्या वडिलांचे प्रॉडक्शन हाऊस सांभाळू लागला.

२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने. या चित्रपटातील त्याची भूमिका नकारात्मक होती. पण तरिही प्रभासच्या अर्थात बाहुबलीच्या भूमिकेच्या तोडीस तोड होती.

या भूमिकेसाठी राणाने आपले वजन १०० किलोपर्यंत वाढवले. यासाठी तो रोज आठ वेळा जेवायचा. दिवसभरात ४० अंडी आणि दर दोन तासाला भात, अशी ४००० कॅलरी तो घ्यायचा. आपल्या बॉडीवरही त्याने काम केले. यासाठी खास ट्रेनर ठेवला. एवढेच नाही तर दीड कोटी रूपयांची एक जिम मशीनही मागवली. रोज ८ तास तो जिममध्ये घालवायचा.

राणाने तेलगूशिवाय हिंदी चित्रपटांतही काम केले. द गाझी, दम मारो दम, ये जवानी है दीवानी, बेबी या बॉलिवूडपटांत तो झळकला.

दम मारो दम या चित्रपटादरम्यान राणाचे नाव बिपाशा बासूसोबत जोडले गेले. त्यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. बिपाशाचं नाही तर चेन्नई ब्युटी तृषा कृष्णा आणि टॉप कन्नड अभिनेत्री रागिणी द्विवेदी यांच्यासोबतही त्याचे नाव जुळले. अर्थात तृषासोबत ब्रेकअप झाल्यानंतर राणा आपली पर्सनल लाईफ लपवू लागला.

राणा फक्त एकाच डोळ्याने बघू शकतो.  राणा डाव्या डोळ्याने बघू शकत नाही. लहानपणी राणाला डावा डोळा कोणीतरी डोनेट केला होता. मात्र त्याने तो कधीच बघू शकला नाही. याबाबतचा खुलासा राणाने एका तेलगू भाषिक रिअ‍ॅलिटी शोमध्ये केला होता. 

 मी माझा उजवा डोळा बंद केला तर मला काहीच दिसणार नाही  राणाचे हे शब्द अनेकांना धक्का देणारे होते. जेव्हा राणा बोलत होता तेव्हा सगळेच हतबल होऊन त्याच्याकडे बघत होते.  


Web Title: Happy Birthday Rana Daggubati: bahubali fame rana daggubati birthday special facts
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.