इंंटरनेटचा बॉयफ्रेंड! चित्रपटात फ्लॉप, पण सोशल मीडियाचा STAR आहे विनोद खन्नाचा मुलगा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 08:00 AM2021-06-20T08:00:00+5:302021-06-20T08:00:02+5:30

Rahul Khanna Birthday : लाईमलाईटपासून दूर आहे. पण म्हणून त्याची लोकप्रियता कमी नाही. आजही लोक त्याला ‘इंंटरनेटचा बॉयफ्रेंड’ म्हणून ओळखतात.

happy birthday rahul khanna see photos of son of vinod khanna | इंंटरनेटचा बॉयफ्रेंड! चित्रपटात फ्लॉप, पण सोशल मीडियाचा STAR आहे विनोद खन्नाचा मुलगा 

इंंटरनेटचा बॉयफ्रेंड! चित्रपटात फ्लॉप, पण सोशल मीडियाचा STAR आहे विनोद खन्नाचा मुलगा 

googlenewsNext
ठळक मुद्देसुरूवातीपासूनच राहुल स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करू इच्छित होता. कदाचित त्याचमुळे त्याला बॉलिवूड भावले नाही.

सुपरस्टार विनोद खन्ना (Vinod Khanna) यांचा मुलगा राहुल खन्ना (Rahul Khanna )आज त्याचा वाढदिवस साजरा करतो. राहुल खन्ना वडिलांसारखा स्टार बनू शकला नाही. पण सोशल मीडियावर मात्र राहुल स्टार आहे. होय, त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट बघितले की, तुम्हालाही त्याचा अंदाज येईल.
राहुल खन्नाने दिग्दर्शक दीपा मेहताच्या ‘1947 अर्थ’ या सिनेमातून डेब्यू केला होता. या सिनेमासाठी राहुलला फिल्मफेअर बेस्ट डेब्यू अवार्डही मिळाला होता.  (Rahul Khanna Birthday)

सैफ अली खानचा ‘लव आज कल’ या सुपरहिट सिनेमातही तो दिसला.  2007 साली ‘रकीब’ या सिनेमात तो झळकला. अनुराग सिंहने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात राहुल खन्नासोबत जिमी शेरगील, तनुश्री दत्ता मुख्य भूमिकेत होते.

रकीब या सिनेमानंतर राहुल खन्नाचा लुक प्रचंड बदलला. आपल्या फिल्मी करिअरमध्ये राहुलने सुमारे 11 चित्रपटांत काम केले. पण  सिनेमे चालेनात. मग राहुल खन्ना छोट्या पडद्याकडे वळला. ‘द अमेरिकन्स’ या टीव्ही शोमध्ये तो दिसला.

गतवर्षी राहुल खन्ना त्याच्या न्यूड सेल्फीमुळे चर्चेत आला होता. यात त्याने आरशासमोर सेल्फी काढला होता. याशिवाय त्याच्या सेमी न्यूड फोटोंचीही जबरदस्त चर्चा झाली होती.
राहुल सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टावर तो रोज नवे फोटो शेअर करत असतो. विनोद खन्ना सारख्या सुपरस्टारचा मुलगा असूनही राहुलला लाईमलाईटपासून दूर राहणे आवडते.

सुरूवातीपासूनच राहुल स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करू इच्छित होता. कदाचित त्याचमुळे त्याला बॉलिवूड भावले नाही.
आज राहुल खन्ना भलेही बॉलिवूडमधून गायब आहे. लाईमलाईटपासून दूर आहे. पण म्हणून त्याची लोकप्रियता कमी नाही. आजही लोक त्याला ‘इंंटरनेटचा बॉयफ्रेंड’ म्हणून ओळखतात. संपूर्ण आशियात त्याचे असंख्य फॅन्स आहेत आणि यात तरूणींची संख्या मोठी आहे.

Web Title: happy birthday rahul khanna see photos of son of vinod khanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.