सनी लिओनीला झोपताना आला होता विचित्र अनुभव, क्रिती सेननचीही उडाली होती रात्रीची झोप....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 01:55 PM2020-10-31T13:55:17+5:302020-10-31T13:55:26+5:30

हॅलोवीन निमित्ताने वाचा काही सेलिब्रिटींसोबत झालेल्या काही अशा घटना ज्यांनी त्यांची झोप उडाली होती.

Halloween 2020 : Sunny Leone, Kriti Sanon, Janhvi Kapoor share real life horror stories | सनी लिओनीला झोपताना आला होता विचित्र अनुभव, क्रिती सेननचीही उडाली होती रात्रीची झोप....

सनी लिओनीला झोपताना आला होता विचित्र अनुभव, क्रिती सेननचीही उडाली होती रात्रीची झोप....

googlenewsNext

हॉरर सिनेमा बघून भलेही काही लोकांना भिती वाटत असेल, पण एक मोठा वर्ग या जॉनरे सिनेमे आवडीने बघतो. पण विषय जर रील नाही रिअल लाइफचा असेल तर लोकांचा इंटरेस्ट आणखी वाढतो. या हॅलोवीनला वाचा काही सेलिब्रिटींसोबत झालेल्या काही अशा घटना ज्यांनी त्यांची झोप उडाली होती.

'दिलवाले' शूटींगवेळी घाबरली होती क्रिती

'दिलवाले'च्या शूटींगवेळी क्रिती सेननसोबत विचित्र घटना घडली होती. तिच्या मेकअप आर्टिस्टला हॉटेल रूममध्ये कुणीतरी असल्याचा भास झाला होता. क्रितीने सांगितलं होतं की, तिच्या मेकअप आर्टिस्टला वाटलं होतं की, कुणीतरी तिला धक्का देत आहे. त्यावेळी एक लोशनची बॉटल टेबलवरून पडली होती. तेव्हा तर तिला कुणी स्पर्शही केला नव्हता. ती बॉटल उचलून त्याच जागी ठेवण्यात आली होती. आणि नंतर पुन्हा ती बॉटल पडली. त्यांनी जेव्हा लक्ष देऊन पाहिलं तर ना टेबल हलत होता आणि ना हवा होती. क्रितीने सांगितलं की, हा फार घाबरवणारा अनुभव होता.

राजस्थानमध्ये सनीसोबत विचित्र घटना

सनी लिओनीही तिच्या कामानिमित्ताने देशभरात फिरली आहे. पण राजस्थानमधील एक अनुभव कदाचित ती कधी विसरणार नाही. तिने सांगितले होते की, झोपताना तिला रूममध्ये फारच भीतीदायक अनुभव आला होता.

एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, मला स्लीप पॅरालिसिस झाला होता. मला उठण्यासाठी माझी पूर्ण ताकद लावावी लागली होती. मला असं जाणवलं होतं की, कुणीतरी मला पकडून ठेवलंय. ही घटना जेव्हा तिसऱ्यांदा रिपीट झाली तेव्हा मी जोरात ओरडले होते की, 'मला एकटं सोडा'. सनीने सांगितले की, माझ्या ओरडण्याचा फायदा झाला आणि त्यानंतर ती आरामात झोपू शकली.

जान्हवीसोबत काम करणारे पडले होते आजारी

जान्हवी कपूरनेही एका हॉरर सीरीजच्या शूटींगवेळची एक घटना सांगितली होती. ती म्हणाली होती की, काहीतरी असं विचित्र झालं होतं की, त्यामुळे ती तिचं डोकंही हलवू शकत नव्हती. एका पोस्टमध्ये तिने खुलासा केला होता की, या प्रोजेक्टचं काम पूर्ण झाल्यावर सोबत काम करणारे १० लोक आजारी पडले होते.
 

Web Title: Halloween 2020 : Sunny Leone, Kriti Sanon, Janhvi Kapoor share real life horror stories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.