नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळाली Good Newwz, वाचा काय आहे ही गोड बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 03:11 PM2020-01-01T15:11:08+5:302020-01-01T15:12:28+5:30

अक्षय आणि करिनाच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे.

‘Good Newwz’ Box Office Day 5: Akshay-Kareena, Kiara-Diljit’s Film Set To Enter 100 Crore Club | नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळाली Good Newwz, वाचा काय आहे ही गोड बातमी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळाली Good Newwz, वाचा काय आहे ही गोड बातमी

googlenewsNext
ठळक मुद्दे31 डिसेंबरला या चित्रपटाने 16.20 कोटी कमावले असून या चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 94.60 इतके झाले आहे. हा सिनेमा लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणार आहे. 

अक्षय कुमार, करिना कपूर, दलसित दोसांज आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेल्या गुड न्यूज या चित्रपटाला समीक्षकांनी खूपच चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता समीक्षकांनंतर प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली होती. य चित्रपटाने पहिल्या दिवशी 17.56 कोटी, दुसऱ्या दिवशी 21.78 कोटी, तिसऱ्या दिवशी 25.65 कोटी इतकी कमाई केली होती. पहिल्याच विकेंडला या चित्रपटाने चांगलेच कलेक्शन केले असल्याने अक्षय आणि करिनाचे फॅन्स प्रचंड खूश आहेत.

गुड न्यूजने दुसऱ्या आठवड्यात देखील बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 13.41 कोटी कमावले आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या दोन्ही दिवसांत हा सिनेमा बक्कळ कमाई करेल असा अंदाज तरण आदर्श यांनी व्यक्त केले होता. त्याचप्रमाणे 31 डिसेंबरला या चित्रपटाने 16.20 कोटी कमावले असून या चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 94.60 इतके झाले आहे. हा सिनेमा लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणार आहे. 



 

गुड न्यूज या चित्रपटाचा विषय हा आजवरच्या बॉलिवूड चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे. त्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. दिग्दर्शक राज मेहता ‘गुड न्युज’ हा अत्यंत आगळ्यावेगळ्या विषयावरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत.

आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने चित्रपटातील दोन्ही जोडपे अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात. पण, त्यात जो काही गोंधळ उडतो, त्यातून चित्रपटात धम्माल गमतीजमतींचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे कथानक हे अत्यंत मनोरंजक आणि गंमतीदार असे असून ‘गुड न्यूज’ हा अत्यंत कॉमेडी, रोमान्स आणि धम्माल गंमतीजमतींचा पॅकेज चित्रपट आहे.

Web Title: ‘Good Newwz’ Box Office Day 5: Akshay-Kareena, Kiara-Diljit’s Film Set To Enter 100 Crore Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.