जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे. आता तिने तमीळ वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.


जॉर्जिया आता, "व्हिक्टिम" नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये एका वकिलाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेबसिरीजचे प्रीमियर आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमन के जंगवाल यांनी केले आहे. 


 या आधी जॉर्जियाने तामिळ वेब सिरीज "केरोलिना कामाक्षी" मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे कौतूक देखील झाले होते. 
 तिचा बॉलिवूड डेब्यू 'वेलकम टू बजरंगपूर' गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. यात जॉर्जिया एका अशा महिलीची भूमिका साकारणार आहे जी परदेशातून गावात येते. जिथे त्याची ओळख श्रेयस तळपदेसोबत होते. हा सिनेमा 'वेलकम टू सज्जनपूर' सिनेमाचा फ्रेंजाईज आहे. ज्यात श्रेयस आणि अमृता राव मुख्य भूमिकेत होते. मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान इटालियन मॉडल जॉर्जियाला डेट करतोय आहे. दोघांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये पाहिले जाते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Giorgia andriani will play lawyer role in web series gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.