BMCच्या FIRवर गौहर खानच्या टीमने केला खुलासा, म्हणाले - 'तर्कवितर्क लावणे बंद करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 01:18 PM2021-03-16T13:18:02+5:302021-03-16T13:19:04+5:30

Gauhar Khan Team Statement : कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री गौहर खानच्या विरोधात मुंबई महानगर पालिकेने एफआयआर दाखल केली होती.

Gauhar Khan's team reveals on BMC's FIR, says - 'Stop arguing' | BMCच्या FIRवर गौहर खानच्या टीमने केला खुलासा, म्हणाले - 'तर्कवितर्क लावणे बंद करा'

BMCच्या FIRवर गौहर खानच्या टीमने केला खुलासा, म्हणाले - 'तर्कवितर्क लावणे बंद करा'

googlenewsNext

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सरकाराने दिलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यादरम्यान कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री गौहर खानच्या विरोधात मुंबई महानगर पालिकेने एफआयआर दाखल केली होती. आता या प्रकरणी तिच्या टीमकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे.


गौहर खानच्या टीमने अभिनेत्रीचे स्टेटमेंट प्रदर्शित करत प्रतिक्रिया दिली आहे. यात म्हटले आहे की, गौहर खानला शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार. इथे त्यांचा लेटेस्ट रिपोर्ट आहे. त्यांचे सर्व प्रकारच्या तपासण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्या नियमांचे पालन करणाऱ्या नागरिक आहेत आणि मुंबई महानगर पालिकेच्या सर्व कायद्यांना त्या सहयोग करत आहेत. सर्वांना विनंती आहे आता या तर्कवितर्कांना पूर्णविराम लावा.


पुढे लिहिले की, गौहर खान बीएमसीच्या सर्व प्रक्रियेला योगदान देत आहे. सर्वांना विनंती आहे की अफवा पसरवू नका आणि गौहरच्या भावानात्मक स्थितीला समजून घ्या. कारण नुकतेच तिने तिच्या वडिलांचे छत्र हरपले आहे. हा वेळ तिच्यासाठी खूप कठीण आहे. तिला दुःखाच्या वेळी सांभाळू द्या.


असं सांगितलं जात आहे की, गौहरवर आरोप आहे की, तिला कोरोनाची लागण झाली आहे आणि नियमांचे पालन न केल्यामुळे चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. जेव्हा बीएमसीचे अधिकारी गौहर खानच्या घरी तपासणीसाठी पोहोचले तेव्हा ती तेथे सापडली नाही.


त्याचवेळी, मुंबई पोलिसांचे प्रवक्ते एस. चैतन्य यांनी सांगितले की, गौहर खान Gauhar Khan यांच्याविरुध्द ओशिवरा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 188, 269, 270, 51 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ते म्हणाले, गौहर खानला कोरोनाची लागण झाल्याचे समजले गेले आहे आणि ती नियमांचे उल्लंघन करत घराबाहेर चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.

Web Title: Gauhar Khan's team reveals on BMC's FIR, says - 'Stop arguing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.