आठवड्यात प्रत्येक शुक्रवारी कोणता ना कोणता चित्रपट प्रदर्शित होत असतो. कोणता तरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई करतो तर कोणता तरी चित्रपट फ्लॉप होतो. मात्र बऱ्याचदा चित्रपटातील छोट्या छोट्या चुकांवर आपले लक्षदेखील जात नाही. या पाच सुपरहिट चित्रपटातील चुका पाहून तुम्ही चकीत व्हाल. 

बँग बँग


२ ऑक्टोबर २०१४ला हृतिक रोशनकतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट बँग बँग प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील एक सीन होता जिथे हृतिक रोशन शत्रूंना मारत असतो आणि थोडीशी दुखापत झाल्यामुळे तो कतरिनाकडे लंगडत जात असतो. मात्र नंतर तो 'तू मेरी' या गाण्यावर नाचू लागतो आणि असा नाचू लागतो की कुणी बोलणार नाही की याला दुखापत झाली आहे.

चेन्नई एक्सप्रेस


चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातील गोवा इज ऑन हा सीन आठवत असेल ना. जेव्हा शाहरूख खान गुंड आणि दीपिकासोबत ट्रेनमध्ये अडकतो. मात्र तुम्ही नोटीस केलं का की शाहरूख ट्रेनच्या जनरल बोगीमध्ये घुसतो पण जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा ती स्लीपर बोगी होते. 

३ इडियट्स


आमीर खान, आर. माधवन, शर्मन जोशी व करीना कपूर यांचा लोकप्रिय चित्रपट म्हणजे ३ इडियट्स. या सिनेमातील एका सीनमध्ये आमीर खान स्टुडंट्सचा क्लास घेत असतो. त्यावेळी तो ग्रीन बोर्डवर काही शब्द लिहितो आणि नंतर ते आपल्या मित्राचे नाव असल्याचे सांगतो. मात्र तुम्ही नीट लक्ष दिलं का की त्या बोर्डवर लिहिलेल्या शब्दाच्या राइटिंगमध्ये बदल झालेला दिसतो आहे.

शोले 


शोले चित्रपटात एक सीन आहे जो चित्रपटाच्या इतिहासात नमूद केला आहे. चित्रपटाच्या शेवटी संजीव कुमार ठाकूर बनून गब्बरला मारधाड करताना दिसतात. चित्रपटात संजीव कुमार यांना हाताशिवाय दाखवले आहे. मात्र काही ठिकाणी त्यांचे हात दिसतात.

रब ने बना दी जोडी


१२ डिसेंबर, २००८ शाहरूख खान व अनुष्का शर्मा यांचा चित्रपट रब ने बना दी जोडी प्रदर्शित झाला. चित्रपटात शाहरूख खान दोन वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसला होता. चित्रपटात तो राज बनून जिथे तो अनुष्कासोबत फ्लर्ट करतो तर सुरेंदरच्या भूमिकेत अनुष्काचा नवरा. सिनेमात दाखवलं आहे की फक्त मिशी हटविल्यानंतर आणि केसांची हेअर स्टाईल बदलल्यानंतर अनुष्का आपल्या नवऱ्यालादेखील ओळखू शकत नाही. ही खूप मजेशीर गोष्ट आहे अशी बायको कुठे असते जी आपल्या नवऱ्याला ओळखू शकत नाही.

Web Title: Funny Mistakes In 5 Bollywood Movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.