आमीरच्या को-अ‍ॅक्ट्रेसनं आईसोबत रडतानाचा बालपणीचा फोटो केला शेअर, ओळखा पाहू कोण आहे ही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 01:08 PM2019-06-29T13:08:42+5:302019-06-29T13:09:09+5:30

सोशल मीडियावर बऱ्याचदा सेलिब्रेटी बालपणीचे फोटो शेअर करताना दिसतात. नुकताच आणखीन एका बॉलिवूडच्या अभिनेत्रीनं इंस्टाग्रामवर फोटो शेअर केलाय.

Fatima Sana Shaikh Childhood Picture On Instagram | आमीरच्या को-अ‍ॅक्ट्रेसनं आईसोबत रडतानाचा बालपणीचा फोटो केला शेअर, ओळखा पाहू कोण आहे ही

आमीरच्या को-अ‍ॅक्ट्रेसनं आईसोबत रडतानाचा बालपणीचा फोटो केला शेअर, ओळखा पाहू कोण आहे ही

googlenewsNext

सोशल मीडियावर बऱ्याचदा सेलिब्रेटी बालपणीचे फोटो शेअर करताना दिसतात. नुकताच आणखीन एका बॉलिवूडच्या अभिनेत्रीनं इंस्टाग्रामवर फोटो शेअर केलाय. या फोटोत ही अभिनेत्री आपल्या आईसोबत दिसते आहे. हा फोटो पाहून तुम्ही विचारात पडला असाल ना की ही अभिनेत्री आहे कोण? विशेष गोष्ट ही आहे की या अभिनेत्रीने बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानसोबत काम केलेले आहे. ही अभिनेत्री म्हणजे फातिमा सना शेख.


फातिमा सना शेख हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला असून या फोटोवर नेटकरी कमेंट्स करत आहेत.

एका युजरने लिहिले की, मला पूर्ण विश्वास आहे की तु क्लासमध्ये टॉप केलं असशील. तर दुसऱ्या युजरनं म्हटलं की, टॉम अँड जेरीचा एपिसोड संपणार आहे. अभ्यास कर. आणखीन एका युजरने लिहिले की, असं वाटतंय की विकेंडला होमवर्क करावा लागतोय. 


फातिमा शेवटची आमीर खान व अमिताभ बच्चन यांच्यासोबत ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये झळकली होती. या चित्रपटांकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. पण, चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.

फार कमी लोकांना माहित आहे की, फातिमाने आपल्या करियरची सुरूवात १९९७ साली इश्क चित्रपटातून केली होती. त्यानंतर चाची ४२०, बडे दिलवाले, वन टू का फोर, बिट्टो बॉस व आकाशवाणीमध्ये झळकली आहे. मात्र फातिमाला दंगल चित्रपटातून लोकप्रियता मिळाली.

२०१६ साली प्रदर्शित झालेल्या दंगल चित्रपटात फातिमाने महिला पहेलवान गीता फोगटची भूमिका केली होती. दंगल चित्रपटाने बॉक्स ऑफसवर खूप चांगली कमाई केली होती.

आमीर व फातिमा यांच्याव्यतिरिक्त साक्षी तंवर व जायरा वसीम मुख्य भूमिकेत होते. 

Web Title: Fatima Sana Shaikh Childhood Picture On Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.