सुशांतच्या नावावर फंड मागून ट्रोल झाली एकता कपूर, यूजर्स म्हणाले - मृत्यु बिझनेस नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 12:25 PM2020-08-19T12:25:06+5:302020-08-19T12:25:14+5:30

एकता कपूर विरोधातील हा हॅशटॅगवर आतापर्यंत लाखो ट्विट आणि रिट्विट झाले आहेत. आता प्रश्न उभा ठाकतो की, अखेर यामागे कारण काय आहे? का लोक एकता कपूरला सोशल मीडियावर ट्रोल करत आहे.

Ekta Kapoor trending on twitter after used Sushant Singh Rajput picture in mental health wellness fund poster | सुशांतच्या नावावर फंड मागून ट्रोल झाली एकता कपूर, यूजर्स म्हणाले - मृत्यु बिझनेस नाही!

सुशांतच्या नावावर फंड मागून ट्रोल झाली एकता कपूर, यूजर्स म्हणाले - मृत्यु बिझनेस नाही!

googlenewsNext

बालाजी टेलीफिल्म्सची मालक आणि डेली सोप क्वीन एकता कपूरसोशल मीडियावर ट्रोल होत आहे. ट्विटरवर #ShameOnEktaKapoor हॅशटॅग ट्रेन्ड होत आहे. एकता कपूर विरोधातील हा हॅशटॅगवर आतापर्यंत लाखो ट्विट आणि रिट्विट झाले आहेत. आता प्रश्न उभा ठाकतो की, अखेर यामागे कारण काय आहे? का लोक एकता कपूरला सोशल मीडियावर ट्रोल करत आहे.

झालं असं की, एकता कपूरने 'पवित्र रिश्ता' नावाने एक फंड सुरू केलाय. जो मेंटल हेल्थ अवेअरनेस करण्याबाबत वापरला जाईल. एकताने या फंडच्या फोटोत सुशांत सिंह राजपूतच्या चेहऱ्याचा वापर केलाय आणि त्याखाली तिच्या फंडबाबत माहिती दिली आहे. या कारणावरून एकता कपूरला ट्रोल केलं जातंय. लोकांचा आरोप आहे की, ती सुशांतचा चेहरा वापरून आपला बिझनेस चमकवत आहे. 

एका यूजरने लिहिले की, मृत्यू बिझनेस करण्यासाठी नसतो. तर एकाने लिहिले की, 'एकता कपूरसाठी मृत्यू एक बिझनेस आहे'. दुसऱ्याने लिहिले की, 'म्हणजे एकता असं म्हणत आहे का की, सुशांत हा मानसिक रूपाने आजारी होता?'.

यासोबत शेकडो ट्विट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात एकता कपूरच्या फंडबाबतच्या पोस्टरवर विरोधात आवाज उठवला आहे. एका यूजरने लिहिले की, 'हा फंड रेजर सुरू करण्याआधी तू सुशांतच्या परिवाराची मदत घेतली होती का? अजून निर्णय आलेला नसताना तू कशी या प्रकरणाला आत्महत्या म्हणू शकते? तू किती निर्दयी आहेस. एका मृत अभिनेत्याच्या मृत्यूतून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतेयं'.

हे पण वाचा :

रिया चक्रवर्ती करायची घरी जादू टोण्याची पूजा, सुशांतच्या घरातील नोकराचा धक्कादायक खुलासा

8 जूनला सुशांतला एकटं का सोडून गेली होती रिया चक्रवर्ती? अभिनेत्रीच्या वकिलाने सांगितले यामागचे कारण

कंगना रानौतचा नसीरूद्दीन शाह यांना टोमणा, 'इतक्या महान कलाकाराच्या शिव्याही प्रसादासारख्या'!

Web Title: Ekta Kapoor trending on twitter after used Sushant Singh Rajput picture in mental health wellness fund poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.