During the shooting of the film, admitted to Vicky kaushal in Hospital, started treatment in Serbia | सिनेमाच्या शूटिंग दरम्यान विकी कौशल हॉस्पिटलमध्ये दाखल, सर्बियामध्ये उपचार सुरु
सिनेमाच्या शूटिंग दरम्यान विकी कौशल हॉस्पिटलमध्ये दाखल, सर्बियामध्ये उपचार सुरु

ठळक मुद्देविक्की कौशल सध्या 'उरी'वर झालेल्या हल्ल्यावर आधारित सिनेमाचे शूटिंग करतोयउरी हल्ल्यावर झालेल्या घटनेवर हा सिनेमा आधारित आहे

संजू मध्ये दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकल्यानंतर विकी कौशल सध्या त्याच्या आगामी सिनेमाची शूटिंग करतोय. 'उरी'च्या शूटिंग दरम्यान एक अॅक्शन सीन शूट करताना विकीला दुखापत झाली आहे. सध्या विकीवर सर्बियाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  


विकी कौशल सध्या 'उरी'वर झालेल्या हल्ल्यावर आधारित सिनेमाचे शूटिंग करतोय. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, विकी अॅक्शन सीनसाठी रोज ट्रेनिंग घेतो आहे कारण या सिनेमात त्याला डेयरडेविल स्टंट करायचे आहेत. एका अॅक्शन सीनचे शूटिंग करताना विक्कीचा हात अचानक दुखायला लागला, त्यानंतर त्याला सर्बियाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या हाताला सुज आलीय. सध्या रोज विक्कीचे फिजीओथेरेपी सुरु आहे. एका आठवड्यानंतर सिनेमाचे शूटिंग पुन्हा एकदा सुरु होणार आहे. 


18 सप्टेंबरला 2016 मध्ये सेनेच्या हेड क्वार्टरवर उरीमध्ये हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले होते. हा हल्ला काश्मीरमध्ये झाला होता. तब्बल सहा तास ही लढाई सुरु होती. सहा तासानंतर दहशतवाद्यांवना कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळाले होते. या सत्य घटनेवर आधारित सिनेमा तयार करण्यात येतोय.  
राजीनंतर विक्की आपल्याला राजकुमार हिरानी यांच्या 'संजू' सिनेमात दिसला होता. संजूमध्ये त्याने संजय दत्तचा मित्र कमलेशची भूमिका साकारली आहे. रणबीर कपूरनंतर विकीने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक झाले होते. 'संजू'नंतर आणखीन एक विक्कीच्या हाती लागला आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार विकी कौशल लवकरच आपल्याला करण जोहरच्या चित्रपटात दिसणार असल्याचे समजतेय.  धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत तयार होणाऱ्या चित्रपटासाठी विकीला कास्ट करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भानु प्रताप सिंग करणार आहे. भानूने धडक चित्रपटाचे ही दिग्दर्शन केले आहे. हा एक हॉरर चित्रपट असणार आहे. यात विक्की कौशल मुख्य भूमिका साकारणार आहे. धर्मा प्रोडक्शन अंतर्गत विक्कीचा हा दुसरा चित्रपट असणार आहे. 
 

Web Title: During the shooting of the film, admitted to Vicky kaushal in Hospital, started treatment in Serbia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.