ठळक मुद्देरंजीत यांचे सगळे ऐकून घेतल्यानंतर धर्मेन्द्र यांनी काय करावे तर रंजीत यांना चित्रपटातून रेखा यांच्याजागी नवी हिरोईन घेण्याचा सल्ला दिला.

अमिताभ बच्चनरेखा यांची लव्हस्टोरी म्हणजे बॉलिवूडची चर्चित लव्हस्टोरी. एकेकाळी अमिताभ व रेखा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. कालांतराने ही जोडी दुभंगली, पण या लव्हस्टोरीचे किस्से मात्र आजही चवीने वाचले जातात. असाच एक किस्सा सध्या व्हायरल होतोय.
तर त्याकाळात अमिताभ व रेखा एकमेकांच्या प्रेमात होते. रिपोर्टनुसार, रेखा व अमिताभ दोघेही बराच वेळ एकत्र घालवत. पण त्यांच्या याच भेटीगाठी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेते रंजीत यांच्यासाठी डोकेदुखी ठरली होती. रंजीत यांनी रेखा व धर्मेन्द्र यांना घेऊन एक सिनेमा बनवणार होते. या सिनेमाचे नाव होते, ‘कारनामा’. चित्रपटाचे शूटींगही सुरु झाले होते.

याचदरम्यान रंजीत यांनी संध्याकाळचे शूटींग शेड्यूल ठेवले. पण संध्याकाळचे शेड्यूल रेखा यांना मान्य नव्हते. कारण काय तर रेखा यांचा संध्याकाळचा वेळ फक्त आणि फक्त अमिताभ यांच्यासाठी राखीव होता. या वेळात रेखा यांना अमिताभ यांच्याशिवाय काहीही नको होते. मग काय, रेखांनी रंजीत यांना शूटींगची वेळ बदलण्याची मागणी केली. रंजीत यांनी ही मागणी अमान्य केली आणि रेखा भडकल्या. त्यांनी थेट शूटींगला येण्यास नकार दिला. हा किस्सा खुद्द रंजीत यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता.

तर रेखा मानायला तयार नव्हत्या आणि रंजीत शूटींग शेड्यूल बदलण्यास तयार नव्हते. एकंदर काय तर दोघांमधील तणाव टोकाला पोहोचला होता. रेखा काहीही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हत्या. मात्र रंजीत यांना त्यांचा सिनेमा पूर्ण करायचा होता. अखेर वैतागून ते धर्मेन्द्र यांच्याकडे गेले आणि त्यांनी आपली समस्या त्यांना सांगितली.

रंजीत यांचे सगळे ऐकून घेतल्यानंतर धर्मेन्द्र यांनी काय करावे तर रंजीत यांना चित्रपटातून रेखा यांच्याजागी नवी हिरोईन घेण्याचा सल्ला दिला. हा सल्ला रंजीत यांनी मानला आणि त्यांनी रेखा यांच्या जागी फराहची निवड करून ‘कारनामा’ पूर्ण केला. विशेष म्हणजे, रंजीत यांनी केवळ फराहला नाही तर धर्मेन्द्र यांच्या जागी विनोद खन्ना यांना घेऊन सिनेमा बनवला..

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: due to amitabh bachchan rekha bollywood villian ranjeet complained about them to dharmendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.