ठळक मुद्देड्रग्जप्रकरणी दीपिकाला एनसीबीने समन्स पाठवला आहे. उद्या 26 सप्टेंबरला दीपिका एनसीबीपुढे हजर राहणार आहे. 

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगल समोर येताच नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) सक्रीय झाले आणि पाठोपाठ बॉलिवूडच्या दिग्गज कलाकाराची नावे समोर आलीत. दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग, सीमोन खंबाटा अशा अनेकांचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. या खुलाशाने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना आता एनसीबीच्या अटकेत असलेला ड्रग्ज पेडलर करमजीत याने आणखी एक खुलासा केला आहे. होय, श्रद्धा कपूर आणि सारा खान या टॉपच्या अभिनेत्रींना कार आणि कुरिअरद्वारे ड्रग्ज पुरवल्याची कबुली त्याने दिली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, एनसीबीच्या चौकशीत करमजीतने अनेकांची नावे घेतली. श्रद्धा कपूर व सारा अली खान यापैकीच दोघी.


 
श्रद्धाच्या नावावर चार ठिकाणी ड्रग्ज पुरवले
करमजीतने श्रद्धा कपूरबद्दल धक्कादायक माहिती दिली. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा कपूरच्या नावावर चार वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्ज पार्सल पोहोचवले आणि चारही वेळा त्याने गाडीत पार्सल दिलेत, असा दावा करमजीतने चौकशीत केला आहे. मात्र हे पार्सल श्रद्धाने स्वत:साठी घेतले होते की अन्य कोणासाठी याची आपल्याला कल्पना नसल्याचे त्याने सांगितले. ड्रग्ज प्रकरणात श्रद्धाचे नाव समोर आल्यानंतर एनसीबीने बुधवारी तिला समन्स जारी केला होता. उद्या शनिवारी एनसीबी तिची चौकशी करणार आहेत.
 
सारा अली खानलाही ड्रग्ज पुरवले!

ड्रग्ल  पेडलर करमजीतने श्रद्धासोबत अभिनेत्री सारा अली खानलाही ड्रग्ज पुरवल्याचा दावा केला. सारा अली खानला दोनदा ड्रग्ज पुरवले आणि दोन्ही वेळा कुरिअरच्या माध्यमातून त्याने हे ड्रग्ज दिले होते, असा दावा करमजीतने केला आहे. करमजीतच्या या दाव्यात किती सत्यता आहे, हे बघण्यासाठी एनसीबीने सारा अली खानलाही चौकशीसाठी बोलावले आहे.

in Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई

 रकुलप्रीतचा ‘ब्लेमगेम’?

आज शुक्रवारी एनसीबीने ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री रकुलप्रीत सिंहची चौकशी केली. चार तासांच्या या चौकशीत रकुलप्रीतने रिया चक्रवर्तीला दोषी ठरवले. मी ड्रग्ज घेत नाही़ ड्रग्ज विक्रेत्यांशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा तिने यावेळी केला. अर्थात 2018 मध्ये रियासोबत ड्रग्जविषयी बोलले होते, अशी कबुली मात्र तिने दिली. अर्थात ही कबुली देताना सगळे खापर रियाच्या डोक्यावर फोडले. रिया चॅटच्या माध्यमातून तिचे सामान (ड्रग्ज) मागवत होती. तिचे सामान माझ्या घरी होते, असा जबाब तिने नोंदवला.

धक्कादायक!! 'त्या' ड्रग्स चॅटिंग ग्रुपची अ‍ॅडमिन होती दीपिका पादुकोण, ज्यात लिहिलं होतं माल है क्या?

उद्या दीपिकाचीही चौकशी
अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचीही एनसीबी उद्या चौकशी करणार आहे. ज्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमध्ये सेलिब्रिटी ड्रग्जबद्दल बोलायचे, दीपिका त्या ग्रूपची अ‍ॅडमिन होती. याच ग्रूपमधून ‘माल है क्या?’ अशी विचारणा तिने केली होती. सुशांत सिंगची टॅलेन्ट मॅनेजर जया साहाच्या चौकशीतून एनसीबीच्या हाती काही चॅट लागले होते. यात दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि दीपिका यांच्या नावाचा उल्लेख होता. या चॅटमध्ये दीपिका करिश्माला ‘माल है क्या?’ असे विचारते.

चौकशीदरम्यान मला दीपिकासोबत राहू द्या...!  

ड्रग्जप्रकरणी दीपिकाला एनसीबीने समन्स पाठवला आहे. उद्या 26 सप्टेंबरला दीपिका एनसीबीपुढे हजर राहणार आहे. त्यापूर्वी दीपिकाचा पती रणवीर सिंग याने एनसीबीला एक विनंती केली होती. 26 तारखेला दीपिकाच्या चौकशीदरम्यान आपल्यालाही तिच्यासोबत हजर राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती रणवीरने एनसीबीला केली होती. दीपिकाला कधीकधी एन्जाइटी आणि पॅनिक अटॅक येतात. अशावेळी ती प्रचंड घाबरते. अस्वस्थ होते, असे कारण रणबीरने दिले होते. आपल्याला कायदेशीर नियम माहित आहेत. नियमानुसार, दीपिकाची चौकशी सुरु असताना मी हजर राहू शकत नाही. पण किमान दीपिकासोबत एनसीबीच्या कार्यालयाच्या आतपर्यंत येण्याची परवानगी तरी मिळावी, असे रणवीरने आपल्या विनंती अर्जात म्हटले होते. तथापि रणवीरची ही विनंती एनसीबीने अमान्य केली आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: drug peddler karamjit reveal he supplied drugs shraddha kapoor and sara ali khan by car and courier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.