Drug connection sara deepika shraddha one more actress in ncb radar | दीपिका-सारा-श्रद्धानंतर ड्रग्स प्रकरणात आले आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव, NCBच्या हाती पुरावे

दीपिका-सारा-श्रद्धानंतर ड्रग्स प्रकरणात आले आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव, NCBच्या हाती पुरावे

सारा अली खान, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर आणि दीपिका पादुकोण नंतर बॉलिवूडमधील आणखी एक अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर आहे. 40 वर्षांच्या या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये एका पेक्षा एक हीट सिनेमा दिले आहेत. 

ही अभिनेत्री 2005, 2006च्या काळातील आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार अटक केलेल्या ड्रग्स पेडलर्स अनुज केशवानी आणि अंकुशच्या चौकशीनंतर या अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. या अभिनेत्रीची मॅनेजर तिच्यापर्यंत ड्रग्स पोहोचवायची. या अभिनेत्रीची मॅनेजर ड्रग्स पेडलर अनुजची गर्लफ्रेंड होती.


एनसीबीच्या चौकशीचा करावा लागू शकतो सामना
या अभिनेत्रीने 2019मध्ये ड्रग्सची खरेदी केली असल्याची ठोस माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे. मॅनेजरने एक ते दोन वेळा ड्रग्स पेडलर्ससोबत मीटिंग देखील केली होती. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत आधी अभिनेत्रीच्या मॅनेजरला आणि नंतर अभिनेत्रीला 
एनसीबीच्या चौकशीचा सामना करावा लागू  शकते.  

एनसीबीच्या या तपासात दीपिका पादुकोणचे जया साहाच्या मॅनेजर करिश्मा सोबत झालेल्या चॅट्स समोर आल्या आहेत. जया साहा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचे चॅटदेखील समोर आले आहेत.यात श्रद्धा जयाकडून सीबीडी ऑयल मागत होती. चौकशीत चॅटमध्ये काही इंग्रजी अक्षरे कोड म्हणून वापरली जात असल्याचे निष्पन्न झाले. कोड्सनुसार DNSK (D म्हणजे दीपिका पादुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि करिश्मा प्रकाश) आहे. 

बॉलिवूड अभिनेत्रींची ड्रग्स प्रकरणात नाव समोर आल्यानंतर रविना टंडनने ट्विटरवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे. यात ती म्हणते, 'आता सफाईची वेळ आली आहे. स्वागत आहे! आपल्या येणाऱ्या पिढ्यांची मदत होईल. इथून सुरूवात करा त्यानंतर दुसऱ्या क्षेत्राकडे वळा. मुळापासून उखडून फेका. दोषी, यूजर्स, डीलर्स, सप्लायर्सना शिक्षा द्या. फायदा घेणारे मोठे लोक निशाण्यावर आहेत. जे दुसऱ्यांकडे बघतही नाही आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त करतात'. रविनाची ही पोस्ट ना कुणाच्या समर्थनात आहे ना कुणाच्या विरोधात आहे. तिने न्यूट्रल राहून समोर येत असलेल्या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलंय.

Drugs case: दीपिका व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये विचारते, 'माल आहे का?' Hash ना?, गांजा नाही, वाचा पूर्ण चॅट

ड्रग्स केसमध्ये नाव येताच दीपिका झाली ट्रोल, लोक म्हणाले - एक चुटकी ड्रग्स की किमत तूम क्या जानो...

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Drug connection sara deepika shraddha one more actress in ncb radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.