In 'Dostana 2', Karthik Aryan is not replaced by Vicky Kaushal, but Rajkumar Rao? | 'दोस्ताना २'मध्ये कार्तिक आर्यनच्या जागी विकी कौशल नाही तर राजकुमार रावची वर्णी?

'दोस्ताना २'मध्ये कार्तिक आर्यनच्या जागी विकी कौशल नाही तर राजकुमार रावची वर्णी?

बॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा चित्रपट 'दोस्ताना २' मधून नुकताच कार्तिक आर्यनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यानंतर आता कार्तिक आर्यनच्या जागी कोणत्या अभिनेत्याची वर्णी लागणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान या चित्रपटात विकी कौशलची वर्णी लागल्याचे बोलले जात होते. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्तिक आर्यनच्या जागी राजकुमार रावची वर्णी लागणार आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोस्ताना २ साठी कार्तिक आर्यनच्या आधी निर्मात्यांना राजकुमार रावला विचारण्यात आले होते. मात्र त्याच्याकडे तारखा उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या हातून हा चित्रपट गेला होता. मात्र दोस्ताना २मधून कार्तिक आर्यनची एक्झिट झाल्यानंतर आता पुन्हा राजकुमार रावला या चित्रपटाची ऑफर दिल्याचे समजते आहे आणि आता कार्तिक आर्यनच्या जागी राजकुमार राव दिसणार असल्याचे समजते आहे.


 मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण जोहरने कार्तिक आर्यनला 'दोस्ताना २' मधून काढून टाकले आहे आणि भविष्यात कार्तिक आर्यनबरोबर कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्तिक आर्यनच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळे आणि सिनेमाच्या स्क्रिप्टला घेऊन असलेल्या मतभेदमुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.


कार्तिकला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर करणने त्याच्यासह मैत्रीदेखील तोडल्याचे समोर आले आहे. करणने कार्तिकला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.यावरुन आता करणला कोणत्याही प्रकारचा कार्तिकसह संबंध ठेवायचा नसल्याचे स्षष्ट होते. तसंच भविष्यात कार्तिक आर्यनसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: In 'Dostana 2', Karthik Aryan is not replaced by Vicky Kaushal, but Rajkumar Rao?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.