Dostana 2: 'Don't force me to hang like Sushant', Kangana Ranaut takes to the field in support of Kartik Aryan | Dostana 2: 'सुशांतसारखे लटकण्यासाठी भाग पाडू नका', कार्तिक आर्यनच्या समर्थनात मैदानात उतरली कंगना राणौत

Dostana 2: 'सुशांतसारखे लटकण्यासाठी भाग पाडू नका', कार्तिक आर्यनच्या समर्थनात मैदानात उतरली कंगना राणौत

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या चर्चेत आला आहे. खरेतर धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट दोस्ताना २मधून कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यानंतर कार्तिक आर्यनचे चाहते त्याच्या समर्थनात पुढे आले आहेत. आता बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतही कार्तिक आर्यनच्या बाजूने मैदानात उतरली आहे आणि करण जोहरवर निशाणा साधला आहे. कंगना राणौतने एका पाठोपाठ एक असे बरेच ट्विट केले आहे.


कंगना राणौतने ट्विट करत लिहिले की, कार्तिक आर्यन आपल्या हिमतीवर इथपर्यंत पोहचला आहे आणि आपल्याच मेहनतीवर तो असे करत राहिल. फक्त वडील जो आणि त्यांची नेपो गँग क्लबला विनंती आहे की कृपया त्याला एकट्याला सोडा. सुशांत सिंग राजपूतसारखे त्याच्या मागे पडू नका की तो फासावर लटकण्यासाठी लाचार होईल. गिधाड्यांनो त्याला एकट्याला सोडा.


कंगना राणौतने पुढे ट्विटमध्ये म्हटले की, कार्तिक आर्यनला या चिल्लरांशी घाबरण्याची गरज नाही. खराब आर्टिकल लिहिणे आणि घोषणा करून फक्त तुमचे मनोबल पाडण्यासाठी तुमच्या वर्तणूकीला जबाबदार ठरवत  प्रतिष्ठित शांतता राखू इच्छितात. त्यांनी सुशांत सिंग राजपूतसाठी ड्रग्सचे व्यसन आणि वाईट वर्तणूकची कथा अशाच पसरविल्या होत्या.


कंगना राणौतने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, कार्तिक आर्यन आम्ही तुझ्यासोबत आहोत. ज्यांनी तुला बनवले नाही ते तुला तोडू शकत नाहीत. आज तुला एकटेपणा वाटत असेल पण असे वाटून घेण्याची गरज नाही. प्रत्येक जण ड्रामा क्वीन जो शी परिचित आहे. तू स्वतःवर विश्वास ठेव आणि शिस्तबद्ध रहा.

कार्तिक आर्यनचे चाहते  त्याच्या समर्थनात पुढे आले असून ते करण जोहरला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dostana 2: 'Don't force me to hang like Sushant', Kangana Ranaut takes to the field in support of Kartik Aryan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.