दिशा पाटनीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. इंस्टाग्राम वर 23 मिलियनहून अधिक तिचे फॉलोअर्स आहेत. तसेच शूटिंगच्या बिझी शेड्युअलमधून वेळ मिळतो तेव्हा दिशा सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते.  सतत ती तिचे विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोला रसिकांचे खूप सारे कमेंटस आणि लाईक्स असतात. मात्र नुकताच तिने शेअर केलेला फोटो पाहून तिचे चाहते नाराज झाल्याचे पाहायला मिळतंय. शेअर केलेल्या फोटोत तिने सिल्वर ड्रेस आणि लाल लिपस्टिक लावली आहे.

नेहमी प्रमाणे ती या फोटोत ग्लॅमरस दिसत आहे. मात्र काहींनी तिचा हा फोटो पाहून संमिश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत. काहींना तिचा हा लूक अजिबात आवडलेला नाही. मेकअपमुळे ''तुझा चेहरा तु खराब केला आहेस'' अशा प्रकारे कमेंटस तिला युजर्स देत आहेत.  दिशा लवकरच आदित्य रॉय कपूरसह 'मलंग' सिनेमात झळकणार आहे. सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे.


Also Read: दिशा पाटनी करतेय टायगरला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न, पण...


तसचे कामाव्यतिरिक्त दिशाचे टायगर श्रॉफसह नाव जोडले जाते. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, हे दोघांचेही ठरलेले वाक्य. एका ताज्या मुलाखतीत दिशाला नेमका हाच प्रश्न विचारण्यात आला. ‘तुम्ही दोघंही तुमचं नातं स्वीकारत का नाही’, असा थेट प्रश्न दिशासमोर ठेवला गेला. या प्रश्नाने दिशा थोडी अवघडली. पण अशा प्रश्नांना चतुराईने टाळायचे अंगी असलेले कसब तिने यावेळीही दाखवले.

 

टायगरसोबत अफेअर तर सोडाच, पण मी अद्याप त्याला इंम्प्रेस करू शकलेले नाही, असे दिशा या प्रश्नावर म्हणाली. ‘टायगरला इम्प्रेस करणे फार कठीण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या एकाच गोष्टीसाठी मी प्रयत्न करतेय. पण अद्यापही मी त्याला इंप्रेस करू शकलेले नाही. माझे नशीब मला साथ देत नाहीये. आम्ही दोघं एकत्र फिरतो, लंच डिनर करतो पण याचा अर्थ असा नाही की या सर्व गोष्टींनी तो इम्प्रेस होतो. निदान तुमचा क्रश इम्प्रेस होतो तसा तर नाहीच नाही. त्यामुळे तुम्ही पुढच्या वेळी त्यालाच हा प्रश्न विचारा. कदाचित आम्ही दोघेही लाजाळू स्वभावाचे असल्याने कोणीच तसा प्रयत्न करत नाही, असे दिशा म्हणाली.


Web Title: Disha Patani Trolled On Social Media For Posting This Selfie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.