disha patani trying to impress tiger shroff since so long | दिशा पाटनी करतेय टायगरला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न, पण...

दिशा पाटनी करतेय टायगरला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न, पण...

ठळक मुद्देदिशा लवकरच सलमान खानच्या ‘भारत’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 5 जूनला प्रदर्शित होणार आहे.

ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पाटनी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या नात्यांबद्दल काहीही लपून राहिलेले नाही. पण टायगर-दिशा अद्यापही असले काही मानायला तयार नाहीत. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, हे दोघांचेही ठरलेले वाक्य. एका ताज्या मुलाखतीत दिशाला नेमका हाच प्रश्न विचारण्यात आला. ‘तुम्ही दोघंही तुमचं नातं स्वीकारत का नाही’, असा थेट प्रश्न दिशासमोर ठेवला गेला. या प्रश्नाने दिशा थोडी अवघडली. पण अशा प्रश्नांना चतुराईने टाळायचे अंगी असलेले कसब तिने यावेळीही दाखवले. टायगरसोबत अफेअर तर सोडाच, पण मी अद्याप त्याला इंप्रेस करू शकलेले नाही, असे दिशा या प्रश्नावर म्हणाली.

‘टायगरला इम्प्रेस करणे फार कठीण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या एकाच गोष्टीसाठी मी प्रयत्न करतेय. पण अद्यापही मी त्याला इंप्रेस करू शकलेले नाही. माझे नशीब मला साथ देत नाहीये. आता ‘भारत’च्या रिलीजची प्रतीक्षा आहे. त्यात मी अनेक स्टंट केले आहेत. कदाचित या चित्रपटानंतर तरी मी टायगरला इंप्रेस करू शकेल. आम्ही दोघं एकत्र फिरतो, लंच डिनर करतो पण याचा अर्थ असा नाही की या सर्व गोष्टींनी तो इम्प्रेस होतो. निदान तुमचा क्रश इम्प्रेस होतो तसा तर नाहीच नाही. त्यामुळे तुम्ही पुढच्या वेळी त्यालाच हा प्रश्न विचारा. कदाचित आम्ही दोघेही लाजाळू स्वभावाचे असल्याने कोणीच तसा प्रयत्न करत नाही, असे दिशा म्हणाली.


दिशा लवकरच सलमान खानच्या ‘भारत’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 5 जूनला प्रदर्शित होणार आहे. सध्या दिशा ‘भारत’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: disha patani trying to impress tiger shroff since so long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.