Direction Patani and Tiger Shroff's relatives gave Green Signal | दिशा पटानी आणि टायगर श्रॉफच्या नात्याला कुटुंबीयांनी दिला ग्रीन सिग्नल
दिशा पटानी आणि टायगर श्रॉफच्या नात्याला कुटुंबीयांनी दिला ग्रीन सिग्नल
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी त्यांच्या अफेअरला घेऊन नेहमीच चर्चेत असतात. मात्र दोघांनी आपले नातं कधीच अधिकृतरित्या स्विकारले नाही. भलेही दोघांनी ही गोष्टी स्वीकारली नसली तरी कुटुंबीयांकडून दोघांच्या नात्याला ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. दिशाचे टायगरची बहिण कृष्णासोबत बॉन्डिंग तसे फारसे चांगले नसले तर ती सध्या त्याच्या आई-वडिलांसोबत आपलं नातं घट्ट करताना दिसते आहे. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून ती टायगरच्या आई-वडिलांसोबत फिरताना दिसते आहे. नुकताच जॅकी श्रॉफ यांनी आपला 61वा वाढदिवस साजरा केला यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिशा सुद्धा पार्टीच्या ठिकाणी हजर असल्याचे कळतेय.   

या पार्टीटा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहे. या व्हिडिओमध्या दिशा टायगरच्या कुटुंबीयांसोबत एक रेस्टोरेंटमधून बाहेर येताना दिसते आहे. यात दिशा, आयशा आणि कृष्णा या तिघी एकत्र दिसतायेत. दोन वर्षांपूर्वी टायगर आणि दिशा एक म्युझिकल व्हिडिओमध्ये एकत्र दिसले होते. या म्युझिकल व्हिडिओचे नाव बेफिकरा होते. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.
 
2016 मध्ये आलेल्या टायगरचा सीक्वलमध्ये दिशा दिसणार आहे. दोघांची केमिस्ट्री पहिल्यांदा पडद्यावर बघायला मिळणार आहे. बागी 2मध्ये टायगर व दिशाची लव्हस्टोरी कॉलेजपासून सुरु होते. पण दिशाचे टायगरऐवजी दुसºया तरूणासोबत विवाह होतो. मध्यंतरानंतर दिशाच्या पतीचा मृत्यू होतो. तिचीही हत्या होते आणि तिच्या मुलाचे अपहरण केले जाते. यानंतर टायगर या मुलाला वाचवतो. ‘बागी2’ हा ‘बागी’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. ‘बागी’मध्ये टायगरच्या अपोझिट श्रद्धा कपूर दिसली होती. यावेळी मात्र श्रद्धाच्या जागी दिशाची वर्णी लागली आहे. ‘बागी’मध्ये टायगर श्रद्धाला वाचवताना दिसला होता. पण ‘बागी2’मध्ये तो दिशाच्या मुलाला वाचवताना दिसेल. खरे ‘बागी2’साठी श्रद्धाही उत्सूक होती. पण दिशा व टायगरची रिअल लाईफ केमिस्ट्री कॅश करण्यासाठी मेकर्सने श्रद्धाला डच्चू देत दिशाला कास्ट केले. साजिद नाडियाडवाला बॅनरखाली तयार करण्यात येणार आहे.     
Web Title: Direction Patani and Tiger Shroff's relatives gave Green Signal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.