Hotel Mumbai : पाहा हॉटेल मुंबईचा दमदार ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 06:22 PM2019-10-23T18:22:25+5:302019-10-23T18:22:56+5:30

मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर हा चित्रपट आधारित आहे.

did you see Dev Patel, Anupam Kher starter Hotel Mumbai trailer? | Hotel Mumbai : पाहा हॉटेल मुंबईचा दमदार ट्रेलर

Hotel Mumbai : पाहा हॉटेल मुंबईचा दमदार ट्रेलर

googlenewsNext
ठळक मुद्देजवानांसोबतच सामान्य लोकांनी देखील प्राणाची पर्वा न करता इतर लोकांचा जीव कसा वाचवला हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

आपल्या शौर्याने लोकांचे प्राण वाचवणाऱ्या शूरांची कथा आपल्याला हॉटेल मुंबई या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपटात देव पटेल, अनुपम खेर, ॲर्मी हॅमर यांच्या मुख्य भूमिका आहेत. 29 नोव्हेंबर 2019 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन ॲन्थोनी मारस करत आहे. 

मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर हा चित्रपट आधारित असून जवानांसोबतच सामान्य लोकांनी देखील प्राणाची पर्वा न करता इतर लोकांचा जीव कसा वाचवला हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 72 तास चाललेल्या ऑपरेशनदरम्यान 1600 जणांचे प्राण वाचवण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ आणि पर्पज एन्टरटेन्मेंटने केली आहे.

या ट्रेलरमध्ये दहशतवाद्यांनी मुंबईत प्रवेश कशाप्रकारे केला. ताजमध्ये येणारे प्रत्येक लोकांनी किती आनंदात हॉटेलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांना आपले प्राण कशाप्रकारे गमवावे लागले. आपला जीव जाणार हे माहीत असताना देखील शेवटपर्यंत त्यांनी न डगमगता त्या परिस्थितीला तोंड दिले.

Web Title: did you see Dev Patel, Anupam Kher starter Hotel Mumbai trailer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.