आईच्या मांडीवर बसलेल्या ही क्युट मुलगी बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 12:11 PM2022-03-25T12:11:11+5:302022-03-25T12:15:52+5:30

आम्ही तुम्हाला एक हिंट देतो, ही मुलगी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याची लेक आहे.

Did you know This cute girl sitting on her mother's lap, today she is famous actress in bollywood | आईच्या मांडीवर बसलेल्या ही क्युट मुलगी बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

आईच्या मांडीवर बसलेल्या ही क्युट मुलगी बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

googlenewsNext

गेलेली वेळ कधीच परत येत नाही, फक्त आठवणीच राहतात! पण काही खास क्षण आपण कॅमेऱ्यात टिपतो. मग जेव्हा जेव्हा ते फोटे समोर येतात तेव्हा तो काळही डोळ्या पुढे उभा राहतो. बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो (Bollywood Actress Childhood Pics) सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

 कोण आहे आईच्या मांडीवर बसलेली ही चिमुकली मुलगी. तुम्हाला एक हिंट देतो, ही मुलगी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याची लेक आहे. या अभिनेत्रीने बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. 

ही गोंडस मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सोनम कपूर आहे. सोनमने आपल्या अभिनय कौशल्यावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. सध्या ती प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. सोनम लवकरच आई होणार आहे. ही गोड बातमी स्वत: सोनमने अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केली. आज सोनमच्या आईचा वाढदिवस आहे त्यानिमित्त सोनमने आईसोबतचे तिचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

सोनम आणि आनंद यांनी २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. अनिल कपूरची लेक सोनमने सावरियाँ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने अगदी मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं.
 

Web Title: Did you know This cute girl sitting on her mother's lap, today she is famous actress in bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.