किंग खान शाहरुख आणि काजोल यांच्या अभिनयाने नटलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाची जादू आज 2५ वर्षा नंतरही कमी झालेली नाही. राज आणि सिमरन अर्थात किंग खान शाहरुख आणि काजोल यांच्या रोमँटिक जोडीने २५ वर्षपूर्वी निर्माण केलीली जादू आजही चित्रपट रसिकांच्या मनावर गारुड घालतेय.

हा सिनेमा इतका हिट झाला की, मराठा मंदिर थिएटरमध्ये दिलवाले दुल्हनिया सिनेमाचे १००० शो झालेत. सिनेमात काजल आणि शाहरुखची रोमँटीक केमिस्ट्री रसिकांना भावली. आजही काजोल आणि शाहरुख याच सिनेमामुळे फेव्हरेट जोडी आहे. अख्या जगाला याड लावणा-या सिनेमा मात्र अजय देवगणने आजपर्यंत पाहिलाय नाही. चक्रावलात ना? पण हे खरंय, खुद्द अजय देवगणनेच सिनेमा पाहिला नसल्याचे सांगितले होते. 

तसेच काजोलला  आधी याच गोष्टीचे आश्चर्य वाटायचे. म्हणून सुरूवातीला ती अजयला वारंवार सिनेमा न पाहण्याचे कारणही विचारायचे. अनेक वेळा विचारल्यानंतर अजय देवगणने त्याचे कारण सांगितले होते.

पण काजोलला अजय देवगणने दिलेले कारण जगासमोर उघड करायचे नाही त्यामुळे तिनेही हे कधीच उघडपणे सांगितले नाही. खरंच कारण जाणून घेण्याची इच्छा असेल तर अजय देवगणलाच विचार तोच काय ते सांगू शकेल असे सांगत तिने वेळ मारून नेली होती. 

प्रेम जुळवता जुळवता अजय देवगण स्वतःच अडकला काजोलच्या प्रेम जाळ्यात, जाणून घ्या हटके लव्हस्टोरी

काजोलने कित्येक मुलाखतीत अजय देवगणबद्दल सांगितले आहे की, ती व तिचा नवरा अजय देवगण यांच्या स्वभावात खूप तफावत आहे. काजोल खूप चुलबुली आहे तर अजय खूप शांत. तरीदेखील त्यांच्यात खूप छान केमिस्ट्री आहे आणि त्यांचा संसार सुरळीत चालू आहे.


अजय देवगणसोबत लग्न होण्याआधी या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती काजोल

काजोल आणि अजयचे लग्न होण्याआधी काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती. काजोल आणि तिच्या मित्राच्या अफेअरची त्यावेळी चांगलीच चर्चा मीडियात रंगली होती. काजोल आणि कार्तिक मेहता हे दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. ते दोघे एकमेकांना अनेक वर्षं डेट करत होते. काजोल आणि अजय यांची पहिली भेट हलचल या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी झाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Did you know? Ajay hasn't watched DDLJ yet, Know The Reason Behind This

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.