ठळक मुद्देकाजोल आणि कार्तिक मेहता हे दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. ते दोघे एकमेकांना अनेक वर्षं डेट करत होते.

काजोल आणि अजय देवगणचे कपल सगळ्यांनाच खूप आवडते. त्यांना न्यासा आणि युग अशी दोन मुले असून अनेक सार्वजनिक कार्यक्रमात ते आपल्या मुलांना घेऊन येतात. तसेच त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर देखील आपल्याला त्यांच्या मुलांचे फोटो पाहायला मिळतात. काजोल आणि अजय देवगण यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. त्या दोघांची पहिली भेट झाली, त्यावेळी ते दोघेही दुसऱ्या कोणासोबत तरी नात्यात होते. त्या दोघांनी अनेक मुलाखतींमध्ये ही गोष्ट कबूल केली आहे.

काजोल आणि अजयचे लग्न होण्याआधी काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती. काजोल आणि तिच्या मित्राच्या अफेअरची त्यावेळी चांगलीच चर्चा मीडियात रंगली होती. काजोल आणि कार्तिक मेहता हे दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. ते दोघे एकमेकांना अनेक वर्षं डेट करत होते. काजोल आणि अजय यांची पहिली भेट हलचल या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी झाली होती.

पहिल्या भेटीत अजय खूप एकलकोंडा असल्याचे काजोलला वाटले होते तर काजोल सेटवर खूप दंगा मस्ती करते असे अजयला जाणवले होते. तसेच ती खूपच बडबडी असल्याची देखील अजयला जाणीव झाली होती. ते दोघे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे असल्याचे त्या दोघांच्या लक्षात आले होते. पण याच कारणामुळे ते दोघे जवळ आले असे म्हणावे लागेल.

गुंडाराज या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईपर्यंत त्या दोघांची चांगलीच मैत्री झाली होती. त्यावेळी काजोल कार्तिकला डेट करत होती. पण त्यांच्या नात्यात काही प्रॉब्लेम सुरू होते आणि त्यामुळे काजोल याबाबत अजयकडूनच सल्ला घेत असे तर त्यावेळी अजय अभिनेत्री करिश्मा कपूरला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. रवीना टंडनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अजय करिश्माच्या प्रेमात पडला असल्याच्या चर्चांना त्याकाळी ऊत आले होते. पण काहीच काळात काजोलचे कार्तिकसोबत आणि अजयचे करिश्मासोबत ब्रेकअप झाले आणि काजोल आणि अजय एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काहीच वर्षांत त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Unknown Facts About Kajol And Ajay Devgn Love Story PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.