बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा आज वाढदिवस असून तिने 1992 साली बॉलिवूडमध्ये बेखुदी चित्रपटातून पदार्पण केले होते. जवळपास 28 वर्षांनंतर ती बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. तसेच बॉलिवूडमुळेच तिला लाइफ पार्टनरदेखील मिळाला तो म्हणजे अजय देवगण. जवळपास 21 वर्षांपासून ते दोघे एकत्र संसार करत आहेत.

काजोलने कित्येक मुलाखतीत अजय देवगणबद्दल सांगितले आहे की, ती व तिचा नवरा अजय देवगण यांच्या स्वभावात खूप तफावत आहे. काजोल खूप चुलबुली आहे तर अजय खूप शांत. तरीदेखील त्यांच्यात खूप छान केमिस्ट्री आहे आणि त्यांचा संसार सुरळीत चालू आहे. 

अजय देवगण व काजोल यांची पहिली भेट 1995 साली झाली होती हलचलच्या सेटवर. त्या दरम्यान त्या दोघांमध्ये एवढी बातचीत झाली नव्हती कारण त्या दोघांचे स्वभाव खूप वेगळे होते. मुलाखतीत अजय देवगणने सांगितले की, काजोल त्याला बडबडी व उद्धट वाटली होती. दुसऱ्यांदा तर त्याला तिला भेटायचेदेखील नव्हते. पण काजोलला एका सीन दरम्यान वाटले की अजय तिच्या जीवनातील महत्त्वाचा हिस्सा बनणार आहे.

पुढचे दोन वर्षे ते एकमेकांना भेटले नाहीत. अजय दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होता आणि काजोलदेखील दुसऱ्या मुलासोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण काही वर्षांनंतर ते भेटले आणि मग त्यांच्यात मैत्री झाली. अजय काजोलसोबत तासन तास बसायचा आणि काजोल तिच्या नात्यातील प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सल्ला देत होता. काजोलला देखील तिच्या रिलेशनशीपमधील समस्या त्याच्याशी शेअर करायला आवडत होते.

हळूहळू दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी एकमेकांना प्रपोज केले.

24 फेब्रुवारी 1999 साली एकमेकांसोबत जीवन व्यतित करायचे ठरविले. एका छोट्याशा फंक्शनमध्ये काही फॅमिली फ्रेंड्सच्या उपस्थितीत ते लग्नबेडीत अडकले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ajay Devgn finds himself trapped in Kajol's love trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.