राजकुमार रावने केली प्लास्टिक सर्जरी? बदललेला लूक पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:02 AM2024-04-15T11:02:22+5:302024-04-15T11:05:17+5:30

राजकुमार नुकताच दिलजीत दोसांझच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला. यावेळी त्याचा लूक काहीसा बदललेला दिसला.

Did Rajkummar Rao do plastic surgery ? Netizens trolled him for his changed look | राजकुमार रावने केली प्लास्टिक सर्जरी? बदललेला लूक पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

राजकुमार रावने केली प्लास्टिक सर्जरी? बदललेला लूक पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आगामी 'श्रीकांत' सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याच्या साध्या स्वभावामुळे आणि अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांचं मनच जिंकलं आहे. राजकुमार नुकताच दिलजीत दोसांझच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला. यावेळी त्याचा लूक काहीसा बदललेला दिसला. नेटकऱ्यांनी त्याच्या लूकमधला बदल लगेचच हेरला आणि त्याने प्लास्टिक सर्जरी केली आहे अशी चर्चा सुरु झाली. 

राजकुमार राव आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही', 'स्त्री 2' या सिनेमांमध्ये दिसणार आहे. सध्या तो 'श्रीकांत' सिनेमाचं प्रमोशन करत आहे. दोन दिवसांपूर्वी पंजाबी गायक दिलजीत दोसांझची मुंबईत कॉन्सर्ट पार पडली. अनेक बॉलिवूड कलाकारांनी यात सहभाग घेतला. यावेळी राजकुमार रावही आला होता. मात्र त्याचा लूक पाहून नेटकऱ्यांमध्ये वेगळीच चर्चा सुरु झाली. त्याच्या हनुवटीचा भाग बदललेला दिसत होता. राजकुमारने चिन इम्पांट केल्याची चर्चा सोशल मीडियात सुरु झाली.

सोशल मीडियावर राजकुमारचा जुना आणि कालचा फोटो व्हायरल होत आहे. त्याच्या दोन्ही लूकमध्ये फरक बघायला मिळत आहे. काही लोकांनी त्याची तुलना 'फायटर' सिनेमातील व्हिलन ऋषभ साहनीशी केली आहे. तर काहींनी त्याला अनुष्का शर्माचा 'मेल व्हर्जन' असंही म्हटलं. 'याची काय गरज होती' असं म्हणत त्याच्यावर टीकाही झाली.

राजकुमार रावचा 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमा 31 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये जान्हवी कपूरसोबत त्याची जोडी आहे. तर १० मे रोजी 'श्रीकांत' सिनेमा रिलीज होत आहे. 

Web Title: Did Rajkummar Rao do plastic surgery ? Netizens trolled him for his changed look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.