ठळक मुद्देजेव्हा मुमताजला समजले की, मला मासे खूप आवडतात, तेव्हा ती दररोज माझ्यासाठी घरी बनवलेले विविध प्रकारचे मासे घेऊन येऊ लागली. मुमताजच्या घरी मासळी रोज बनत असे आणि ती ते माझ्यासाठी आणत असे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपरस्टार सिंगर हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच एक जबरदस्त लहान मुलांचा गायन रिॲलिटी शो ठरला आहे. प्रत्येक आठवड्याला या लहान मुलांची अप्रतिम सादरीकरणे प्रेक्षकांनी पाहिली आहेत आणि आता ही स्पर्धा शिगेस पोहोचते आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात धर्मेंद्र, सनी देओल, करण देओल आणि सहर बाम्बा हजेरी लावणार आहेत. हे या कार्यक्रमात ‘पल पल दिल के पास’चे प्रमोशन करणार आहेत. 
 

या कार्यक्रमातील उर्गेन आणि शकीना या स्पर्धकांनी हम बेवफा हरगिज न थे हे गाणे सादर केले आणि या सादरीकरणाने सनी देओलचे डोळे पाणावले तर अभिनेते धर्मेंद्र यांनी शालिमार चित्रपटाच्या चित्रीकरणाचा तो काळ पुन्हा एकदा अनुभवला. त्या परफॉर्मन्सने सगळेच थक्क झाले आणि देओल कुटुंबियांनी या दोन्ही स्पर्धकांचे त्यांच्या गायनशैलीबद्दल तोंडभरून कौतुक केले. जय भानुशालीने धर्मेंद्र यांच्यासोबत एक छोटासा गेम खेळला. यात त्याने धर्मेंद्र यांच्या काळातल्या सदाबहार अभिनेत्रींची छायाचित्रे दाखवली. त्यात शर्मिला टागोर, हेमा मालिनी, झीनत अमान, मुमताज, रेखा आणि माला सिन्हा यांचा समावेश होता. या खेळात धर्मेंद्र यांनी काही चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांना कशी खास वागणूक देण्यात आली होती, हे सांगितले. ते म्हणाले, “जेव्हा मुमताजला समजले की, मला मासे खूप आवडतात, तेव्हा ती दररोज माझ्यासाठी घरी बनवलेले विविध प्रकारचे मासे घेऊन येऊ लागली. मुमताजच्या घरी मासळी रोज बनत असे आणि ती ते माझ्यासाठी आणत असे आणि मला सेटवर हे घरी बनवलेले मासे भरपूर खायला मिळायचे.”


 
धर्मेंद्र यांनी प्रेक्षकांना सांगितले की, त्यांनी त्यांच्या करियरच्या सुरुवातीला माला सिन्हा यांच्यासोबत अनपढ या चित्रपटात काम केले होते. त्यांनी सांगितले, त्या स्वभावाने खूप कडक होत्या. त्या मला चांगले मार्गदर्शन करायच्या. कारण त्यावेळी मी खूप बुजरा होतो. हळूहळू आमच्यात मैत्री झाली, आम्ही एकमेकांना नीट ओळखू लागलो आणि एकमेकांबद्दलचा आदर वाढला.”


 
सुपरस्टार सिंगरचा हा भाग प्रेक्षकांना शनिवारी आणि रविवारी रात्री 8:00 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Dharmendra told about mumtaz in super singer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.