ठळक मुद्देप्रकाश कौर या दिसायला अतिशय सुंदर असून सनी देओलच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्यांचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात.

धर्मेंद्र यांचा आज म्हणजेच 8 डिसेंबरला वाढदिवस असून बॉलिवूडमधील अतिशय महान अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. धर्मेंद्र यांचे फॅन फॉलॉविंग प्रचंड आहे. सगळ्याच वयोगटातील लोक त्यांचे चाहते असून त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. धर्मेंद्र एक चांगले अभिनेते असण्यासोबतच एक खूप चांगले व्यक्ती आहेत. त्यांच्या डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्त्वाचे नेहमीच कौतुक केले जाते.

धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांतील कोणीच फिल्म इंडस्ट्रीत नव्हते. तसेच या इंडस्ट्रीत त्यांचा कोणीही गॉडफादर देखील नव्हता. पण त्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले. पंजाबच्या लुधियाना शहरातील नुसराली या गावी धरमसिंग देओल यांचा जन्म झाला. केवल किशनसिंग देओल आणि सत्वंत कौर हे त्यांचे आई-वडील. लुधियानाच्या गव्हर्नमेंट सिनिअर सेकंडरी स्कूल आणि फगवारा येथील रामग्रहीय कॉलेजमध्ये धर्मेंद्र यांनी शिक्षण घेतले. वयाच्या १८ व्या वर्षीच फिल्मफेअर’चा न्यू टॅलेंट अ‍ॅवॉर्ड त्यांनी मिळवला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

धर्मेंद्र यांनी दिग्दर्शक अर्जुन हिंगोरानी यांच्या १९६० मधील ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी बॉयफ्रेंड या चित्रपटात साहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. बंदिनी या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यांनी शोले, चुपके चुपके, धर्मवीर, आई मिलन की बेला, फूल और पत्थर, मेरा गाव मेरा देश, यादों की बारात यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 

धर्मेंद्र यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्यांचे खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले. धर्मेंद्र केवळ 19 वर्षांचे असताना त्यांचे लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झाले होते. त्या दोघांना सनी, बॉबी, अजीता, विजेता अशी चार मुले आहेत. त्यांचे हे अरेंज्ड मॅरेज असून त्यांच्या आई-वडिलांनी प्रकाश यांची निवड केली होती. प्रकाश कौर या दिसायला अतिशय सुंदर असून सनी देओलच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्यांचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांचा संसार अतिशय आनंदात सुरू असताना 1975 मध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या अफेअरची चर्चा मीडियात रंगली आणि काहीच वर्षांत त्यांनी लग्न केले.

Web Title: Dharmendra first wife Prakash kaur is very beautiful, see pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.