ठळक मुद्दे दोघांनी संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहेरणवीरच्या आधी दीपिकाला दिग्दर्शिकाशी लग्न करायचे होते

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. गत १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती. सिंधी आणि कोंकणी अशा दोन्ही पद्धतीने त्यांनी लग्न केले. दोघांनी संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. रणवीरच्या आधी दीपिकाला दिग्दर्शिकाशी लग्न करायचे होते. दीपिकाने या गोष्टीचा खुलासा स्वत: केला होता.  

पद्मावत सिनेमाच्या रिलीजच पूर्वी रणवीर आणि दीपिका 'बिग बॉस सीझन 11'मध्ये सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते. त्यावेळी सलमानने दीपिकाला लग्नाबाबत प्रश्न विचारला होता की, तुला कोणाशी लग्न करायचे आहे, कोणाला डेट करायचे आहे आणि कोणाला मारायचे आहे ? 

या प्रश्नावर उत्तर देताना दीपिका म्हणाली होती की, संजय लीला भन्साळींसोबत लग्न करायचे आहे. रणवीर सिंगला डेट करायचेय आणि शाहिद कपूरला मारायचेय. 

दीपिकाचे उत्तर ऐकून सलमान खान थोडासा चकित झाला होता कारण त्यावेळी दीपिका रणवीरसोबत रिलेशनशीपमध्ये होती आणि त्यांच्या लग्नाच्या चर्चा होत्यावेळी सगळीकडे होत्या. 

 

इटलीमध्ये लग्न केल्यानंतर दीपवीरने बेंगळुरु आणि मुंबईत दोन ठिकाणी लग्नाचे रिसेप्शन दिले. रिसेप्शन पार्टी संपल्यानंतर दोघे आपआपल्या कामात व्यस्त झाले आहेत. रणवीर सिंगचा सिम्बा 28 डिसेंबरला रिलीज होणार आहे. यात त्याच्या अपोझिट सारा अली खान दिसणार आहे तर दीपिकाची वर्णी करण जोहरच्या दोस्ताना 2 मध्ये लागल्याची चर्चा आहे. 

Web Title: Deepika Padukone, who did not want Ranveer Singh, wanted to get married with the sanjay leela bhansali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.