ठळक मुद्देदीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास,  सध्या दीपिका  ‘छपाक’ आणि ‘83’  या चित्रपटात बिझी आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण फिल्मी लाईफसोबतच सोशल मीडियावरही चर्चेत असते. होय, सध्या दीपिका तिच्या बदलेल्या लूकमुळे चर्चेत आहेत. दीपिकाचा नवा हेअरकट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या नव्या हेअरकटमधील फोटो दीपिकाने सोशल मीडियावर शेअर केला आणि चाहते ‘खल्लास’ झालेत. केवळ चाहतेच नाही तर दीपिकाचा हबी रणवीर सिंग याची अवस्थाही फार वेगळी नव्हती.

दीपिकाचा नवा अवतार पाहून रणवीरने अशी काही प्रतिक्रिया दिली की, त्याच्या कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधले. दीपिकाच्या नव्या हेअरकटवर पती रणवीरने ‘मार दो मुझे’ अशी कमेंट केली आहे.

रणवीरशिवाय आलिया भट आणि आयुष्यमान खुराणा यांनीही दीपिकाच्या या फोटोवर कमेंट दिली. ‘ओएमजी ब्युटी’ असे आलियाने लिहिले तर आयुष्यमानने इमोजीद्वारे आपली प्रतिक्रिया दिली.
या नव्या लूकमध्ये रविवारी दीपिकाने स्टार स्क्रिन अवॉर्ड्सना हजेरी लावली. काळ्या रंगाच्या डिझायनर गाऊनमध्ये दीपिका शोभून दिसत होती. हा नवा लूक तिला खूप आवडल्याचे  तिने तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले.

तूर्तास दीपिकाने शेअर केलेल्या या नव्या लूकमधील फोटोवर चाहत्यांकडून तुफान लाईक्स आणि कमेंटस येत आहेत. तिच्या नव्या हेअरस्टाइला चाहत्यांनी पसंती दिली आहे. 


दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास,  सध्या दीपिका  ‘छपाक’ आणि ‘83’  या चित्रपटात बिझी आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधरित आहे. लक्ष्मी अग्रवाल या अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमात दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारताना दिसणार आहे.   या सिनेमात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेस्सीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘83’या सिनेमात ती पती रणवीर सिंगसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

Web Title: deepika padukone shares haircut picture ranveer singh replies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.