ठळक मुद्देदीपिकाच्या ‘छपाक’ या सिनेमाबद्दल सांगायचे झाल्यास, हा दीपिका पादुकोण आणि मेघना गुलजार दिग्दर्शित हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे.

बॉलिवूडचा सर्वाधिक एनर्जेटिक हिरो कोण? याचे उत्तर रणवीर सिंग असेच मिळेल. ‘एनर्जी का पावर हाऊस’ म्हणूनही त्याला ओळखतात. पण कधीकधी हा अतिउत्साह सुद्धा नडतो. होय, नुकत्याच एका कॉन्सर्टमध्ये असेच काही झाले. खुद्द रणवीरची पत्नी दीपिकाने रणवीरबद्दलचा एक भन्नाट किस्सा ऐकवला. हा किस्सा ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल. दीपिका तिच्या ‘छपाक’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये आली होती.  या शोदरम्यान कपिल शर्मासोबत गप्पा मारताना दीपिकाने हा किस्सा सांगितला.


मी रणवीरसोबत फिरताना  माझ्या पर्समध्ये खूप सा-या सेफ्टी पिन, सुई दोरा घेऊन फिरते, असे दीपिकाने यावेळी सांगितले. यामागचे कारणही सांगताना दीपिकाने रणवीरबद्दलचा हा भन्नाट किस्सा ऐकवला.
तिने सांगितले की, स्पेनमध्ये बार्सिलोना इथे एका म्युझिक फेस्टिवलमध्ये रणवीर सिंह डान्स करत होता. नेहमीप्रमाणे या कॉन्सर्टमध्येही रणवीर ‘फुल्ल ऑन जोश’ होता. त्याचा अतिउत्साह अगदी शिगेला पोहोचला होता. पण काही विचित्र डान्स स्टेप करताना त्याची टाईट पँट अचानक फाटली. मग काय, दुसरा काही इलाजच नव्हता. माझ्या आजूबाजूचे लोक कॉन्सर्ट एन्जॉय करत होते आणि मी याची उसवलेली पँट शिवत होते.   दीपिकाने आणखीही काही गोष्टी शेअर केल्या. सामान्य पत्नींप्रमाणे मी सुद्धा रणवीरच्या पर्समधून पैसे काढते, असे तिने सांगितले.  रणवीर व दीपिकाने 2018 मध्ये इटलीत लग्नगाठ बांधली होती. त्याआधी अनेक वर्षे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते.


दीपिकाच्या ‘छपाक’ या सिनेमाबद्दल सांगायचे झाल्यास, हा दीपिका पादुकोण आणि मेघना गुलजार दिग्दर्शित हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष या सिनेमातून पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. लक्ष्मीवर 15 वर्षांची असताना लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला होता. यासिनेमातून अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या घटनांचा निषेध नोंदवण्यात येणार आहे.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: deepika padukone revels at the kapil sharma show that ranveer singh ripped his pants at a music fest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.