अभिनेत्री दीपिका पादुकोण लग्न झाल्यापासून एकाही सिनेमात दिसली नाही. शेवटची ती रणवीर सिंगसोबत पद्मावत सिनेमात दिसली होती. लवकरच की 'छपाक' आणि '83'मध्ये दिसणार आहे. तुम्हाला हे ऐकून हैराण व्हाल की दीपिका कोणत्या गोष्टीच्या आधारावर सिनेमात साईन करते. 

इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान दीपिका म्हणाली की, मी आजही सिनेमा 10 वर्षांपूर्वीच्या नियमा प्रमाणे निवडते. मी सिनेमा निवडताना माझ्या मनाचे ऐकते. मी तेच सिनेमे करते जे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचे असतात. सिनेमाची कथा ऐकून मी जर एक्सायडेट झाली तरच सिनेमा साईन करते. 


दीपिका पादुकोणच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, ती लवकरच मेघना गुलजार यांच्या ‘छपाक’ या चित्रपटात दिसणार आहे. लक्ष्मी अग्रवाल हिच्यावर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यावर आधारित आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विक्रांत मेसी अभिनेता दिसणार आहे. तसेच ती ‘८३’ या चित्रपटातही रणवीर सिंगसोबत त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

 दीपिका आणि निमार्ता मधू मंटेना मिळून लवकरच महाभारतावर आधारित चित्रपट मालिकांची निर्मिती करत आहेत. यात दीपिका द्रौपदीची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, द्रौपदीला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटांची कथा लिहिली जाणार आहे. याच एका अटीवर दीपिकाने द्रौपदीचे पात्र साकारण्यास होकार दिला आहे. महाभारतावर आधारित हा चित्रपट दोन वा अधिक भागात प्रदर्शित होईल. चित्रपटाचा पहिला भाग 2021 साली दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणे अपेक्षित आहे. 

Web Title: Deepika padukone reveals her process of choosing films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.