अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर सिंग गेल्या वर्षी लग्नबेडीत अडकले. त्यांच्या लग्नानंतर दीपिका प्रेग्नेंट असल्याची चर्चा सगळीकडे होऊ लागली. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाने प्रेग्नेंसीबाबत खुलासा केला आहे. तिने प्रेग्नेंट असल्याचे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. 

दीपिका म्हणाली की, 'मी कधीना कधी आई बनणार आहे. मात्र महिला किंवा जोडप्यांवर पालक बनण्यासाठी दबाव टाकला नाही पाहिजे. ज्या दिवशी महिलांवर आई बनण्याबाबत विचारण्याचे बंद होईल, त्यावेळीच वास्तविकमध्ये समाजात बदल होऊ शकेल.'

दीपिका व रणवीर यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि तेवढेच ते एकमकांचा आदर करतात. इतकेच नाही तर सोशल मीडियावर त्यांचे प्रेम चाहत्यांना पाहायला मिळते.

दीपिकाच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सांगायचे तर दीपिका सध्या 'छपाक' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती अॅसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसणार आहे. 

लक्ष्मी आणि दीपिकाची पहिली भेट एक वर्षांपूर्वी दिल्लीत एका कार्यक्रमाच्या दरम्यान झाली होती असे दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते. दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यात दीपिका आणि लक्ष्मी या दोघांनाही आपल्या कार्यासाठी गौरवण्यात आले होते. त्यावेळी दीपिका पहिल्यांदा लक्ष्मीला भेटली होती. 

'छपाक' मधून दीपिका पादुकोण निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. यात विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दीपिका आणि मेघना गुलजार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. 

छपाक चित्रपट १० जानेवारी, २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे. 


 


Web Title: Deepika Padukone revealed about pregnancy, said ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.