ठळक मुद्दे23 शहरांतील 60 हजार जणांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. एकूण 180 सेलिब्रिटींना विविध किताब त्यात देण्यात आले.

सेलिब्रिटी आणि त्यांच्या ‘ब्रँड व्हॅल्यू’ची चर्चा नेहमीच होताना दिसते. सेलिब्रिटींच्या यशाअपयशाशिवाय त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील आचरण, माध्यमांमधील त्यांची प्रतीमा यावरून ही ‘ब्रँड व्हॅल्यू’ ठरत असते. जितकी अधिक ‘ब्रँड व्हॅल्यू’ तितकी अधिक मागणी, हे एक साधेसरळ गणित आहे. तूर्तास याच ‘ब्रँड व्हॅल्यू’च्या निकषांवर केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे देशातील सर्वाधिक विश्वासू व आदरणीय सेलिब्रिटी ठरले आहेत. भारतातील सर्वात सुंदर आणि विश्वासू फिमेल सेलिब्रिटीचा मान दीपिका पादुकोणच्या वाट्याला गेला आहे तर आलिया भट सर्वात आकर्षक सेलिब्रिटी ठरली आहे. अनुष्का शर्मा व विराट कोहली हे सर्वाधिक विश्वासू सेलिब्रिटी कपल म्हणून समोर आले आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्स (आयआयएचबी)ने एका सर्वेक्षणानंतर टीआयएआरए (विश्वास, ओळख, आकर्षण, आदर आणि अपील) रिपोर्ट जारी करण्यात आला. यात सेलिब्रिटींना त्यांच्या ‘ब्रँड व्हॅल्यू’नुसार वेगवेगळे किताब देऊन गौरविण्यात आले. 23 शहरांतील 60 हजार जणांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. एकूण 180 सेलिब्रिटींना विविध किताब त्यात देण्यात आले.

 दीपिका ‘विश्वासू’ फिमेल सेलिब्रिटी

गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमध्ये अनेक घडामोडी घडल्या. सुशांत सिंग आत्महत्या, घराणेशाहीचा वाद, ड्रग्ज कनेक्शन अशा अनेक कारणांवरून बॉलिवूड टीकेचे धनी ठरले. काही कलाकारांवरही आरोप-प्रत्यारोप झालेत. दीपिका पादुकोणचे नाव ड्रग्ज प्रकरणात आल्यानंतर तिच्या वाट्यालाही टीका आली. मात्र हीच दीपिका या सर्वेक्षणात सर्वाधिक विश्वासू फिमेल ब्रँड म्हणून समोर आली. सर्वाधिक सुंदर आणि ग्लॅमरस कॅटेगिरीतही दीपिका अव्वल ठरली.

अमिताभ बच्चन सर्वात विश्वसनीय

अमिताभ बच्चन हे भारतातील सर्वात विश्वसनीय आणि आदरणीय सेलिब्रिटी ठरले आहेत. या यादीत ते अव्वल स्थानी आहेत. या श्रेणीत दोन क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. क्रिडा क्षेत्रात एम एस धोनी सर्वात विश्वासार्ह आणि आदरणीय खेळाडू ठरला आहे. तर विराट कोहली व त्याची अभिनेत्री बायको अनुष्का शर्मा सर्वात विश्वासू सेलिब्रिटी जोडपे ठरले आहे.

आयुष्यमानला सर्वाधिक ‘ओळख’

भारतात ज्या सेलिब्रिटीला सर्वाधिक ओळखतात, ते नाव म्हणजे आयुष्यमान खुराणा. होय, या यादीत सर्वाधिक ओळख असलेला सेलिब्रिटी म्हणून आयुष्यमानच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

आलिया-रणबीर सर्वाधिक वादग्रस्त

या यादीत आलिया भट हिला सर्वाधिक आकर्षक सेलिब्रिटीचा किताब मिळाला आहे. याशिवाय आलिया आणि तिचा बॉयफ्रेन्ड रणबीर कपूर  सर्वाधिक वादग्रस्त कपल ठरले आहे.

India’s Most Respected: अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण

Celebrity India Identifies with the most: आयुष्यमान खुराणा

India’s Most Appealing: अक्षय कुमार

India’s Most Beautiful: दीपिका पादुकोण

India’s Most Controversial: हार्दिक पांड्या

India’s Most Attractive: आलिया भट्ट

India’s Most Trendy: विराट कोहली

India’s Most Versatile: नवाजुद्दीन सिद्दीकी

India’s No 1 Heartthrob: रणबीर कपूर

India’s Most Seductive: राधिका आपटे

India’s Most Down to Earth: महेंद्रसिंह धोनी

India’s Most Reliable: सायना नेहवाल

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Deepika Padukone is India’s most beautiful and trusted celebrity: IIHB Study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.