ठळक मुद्देदीपिकाच्या या फॅमिली ग्रुपमध्ये दीपिका, रणवीर, त्या दोघांचे आई-वडील यांचा समावेश आहे. दीपिकाने शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये रणवीरचे नाव दीपिकाने हँडसम म्हणून सेव्ह केले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे सामान्य लोकांप्रमाणेच सेलिब्रेटी देखील सध्या त्यांच्या घरात कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. चित्रपटांचे चित्रीकरण नसल्यामुळे अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहात आहेत. दीपिका पादुकोण तिचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता तिने तिच्या फॅमिली ग्रुपचा व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चॅटमधून तिने तिचा नवरा म्हणजेच रणवीर सिंगचे नाव मोबाईलमध्ये काय सेव्ह केले आहे हे आपल्याला कळत आहे. 

दीपिकाच्या या फॅमिली ग्रुपमध्ये दीपिका, रणवीर, त्या दोघांचे आई-वडील यांचा समावेश आहे. दीपिकाने शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये रणवीरचे नाव दीपिकाने हँडसम म्हणून सेव्ह केले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. रणवीरच्या एका नुकत्याच झालेल्या मुलाखतीचे सगळे कौतुक करत असल्याचे या स्क्रिनशॉटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 

दीपिका आणि रणवीर यांचे कपल त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडते. बॉलिवूडमधील सगळ्यात क्यूट कपलमध्ये त्यांची गणना केली जाते. ते दोघे अनेक सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र हजेरी लावतात. तसेच त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर देखील आपल्याला त्या दोघांचे अनेक फोटो पाहायला मिळतात. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी इटलीत नोव्हेंबर 2018 ला लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला केवळ जवळचे मित्रमैत्रीण आणि नातलग उपस्थित होते. बॉलिवूडचे सर्वात सुंदर जोडपे अर्थात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्नबंधनात अडकले. त्यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. त्यांनी कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Deepika Padukone has Ranveer Singh’s contact as ‘Handsome’ on phone PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.