शॉर्ट फिल्मसाठी अभिनेत्रीने केलं टक्कल; Look पाहून चाहते हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 05:30 PM2021-10-21T17:30:00+5:302021-10-21T17:30:00+5:30

Debina bonnerjee: अनेक कलाकार आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतात.

debina bonnerjee goes bald for short film shubho bijoya video | शॉर्ट फिल्मसाठी अभिनेत्रीने केलं टक्कल; Look पाहून चाहते हैराण

शॉर्ट फिल्मसाठी अभिनेत्रीने केलं टक्कल; Look पाहून चाहते हैराण

Next
ठळक मुद्देया अभिनेत्रीने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे. 

कलाविश्वात असे असंख्य कलाकार आहेत जे अभिनयासोबतच त्यांच्या अथक परिश्रमांसाठी ओळखले जातात. अनेक कलाकार आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतात. यात अनेकदा भूमिकेच्या गरजेनुसार ते त्यांच्या लूकमध्ये किंवा शरीररचनेमध्येही बदल करत असतात. यामध्येच छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय अभिनेत्री भूमिका खरी वाटावी यासाठी चक्क टक्कल केलं आहे. या अभिनेत्रीने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे. 

छोट्या पडद्यावरील देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी ही जोडी साऱ्यांनाच ठावूक आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना विशेष आवडते. त्यामुळे त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.  लवकरच ही जोडी शुभो बिजोया' या शॉर्ट फिल्ममध्ये झळकणार असून त्यासाठी देबिनाने चक्क संपूर्ण केस कापल्याचं समोर आलं आहे.

Biigg Bang या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या 'शुभो बिजोया' या शॉर्ट फिल्मसाठी देबिनाने केस कापले असून तिने संपूर्ण टक्कल केलं आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये एका जोडप्याची कथा सांगण्यात आली आहे. आनंदाने राहणाऱ्या या जोडप्याच्या आयुष्यात अशी एक घटना घडते ज्यामुळे त्यांचं सगळं जीवन बदलून जातं. याच शॉर्ट फिल्मचा एक प्रोमो देबिनाने शेअर केला आहे.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये देबिनाने मुंडण केलं आहे. तर गुरमीत अंध व्यक्तीची भूमिका साकारताना दिसत आहे.  दरम्यान, या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून गुरमीत-देबिना ही जोडी ११ वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जातं.

Web Title: debina bonnerjee goes bald for short film shubho bijoya video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app