Dahi Handi 2019 : या गाण्यांशिवाय अपुरे आहे गोकुळाष्टमीचे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 07:15 AM2019-08-24T07:15:00+5:302019-08-24T07:15:02+5:30

गोकुळाष्टमी म्हटली की, हिंदी चित्रपटातील काही गाणी आपल्याला आवर्जून ऐकायला मिळतातच.

Dahi Handi 2019: Apart from these songs, there is insufficient Gokulasthami celebrity | Dahi Handi 2019 : या गाण्यांशिवाय अपुरे आहे गोकुळाष्टमीचे सेलिब्रेशन

Dahi Handi 2019 : या गाण्यांशिवाय अपुरे आहे गोकुळाष्टमीचे सेलिब्रेशन

googlenewsNext

बॉलिवूडमधील गाणी आणि गोकुळाष्टमी यांचे खूपच जवळचे नाते आहे. गोकुळाष्टमी म्हटली की, हिंदी चित्रपटातील काही गाणी आपल्याला आवर्जून ऐकायला मिळतातच... जाणून घेऊया बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध दहीहंडीची गीते...

गोविंदा आला रे आला 
ब्लफमास्टर चित्रपटातील गोविंदा आला रे आला हे गाणं आज इतकी वर्षं झाले तरी ते ताजे आहे. हा चित्रपट १९६३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आज इतक्या वर्षांनी देखील हे गाणे गोकुळाष्टमीच्या सेलिब्रेशनच्या वेळी नक्कीच ऐकायला मिळते. या गाण्यात शम्मी कपूर यांनी केलेल्या नृत्यावर तर रसिक आजही फिदा आहेत.

मच गया शोर
कुदरत या चित्रपटातील मच गया शोर हे गाणे आपल्याला दहीहंडी सेलिब्रेशनमध्ये आवर्जून ऐकायला मिळते. या गाण्यात अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी आपल्याला पाहायला मिळाले होते. या गाण्यावर अमिताभ यांनी अफलातून नृत्य सादर केले होते.

शोर मच गया शोर देखो आया माखन चोर
बदला या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हावर चित्रीत करण्यात आलेले शोर मच गया शोर देखो आया माखन चोर हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडते. शत्रुघ्न सिन्हाचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना या गाण्यात पाहायला मिळाला होता.

चांदी की डाल पर 
सलमान खान एक चांगला अभिनेता असल्याचे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्याचसोबत तो एक चांगला गायक असल्याचे त्याने हॅलो ब्रदर या चित्रपटाद्वारे सिद्ध केले. चांदी की डाल पर हे हॅलो ब्रदर या चित्रपटातील गाणे त्याने गायले होते. त्याच्या गायन कारकिर्दीतील हे पहिलेच गाणे असले तरी प्रेक्षकांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतले होते. 

हर तरफ है ये शोर
वास्तव या चित्रपटातील हर तरफ है ये शोर हे गाणे गोकुळाष्टमीच्या सेलिब्रेशनमध्ये आपल्याला हमखास ऐकायला मिळते. या गाण्यावर ताल धरायला सगळ्यांनाच आवडतो.

गो गो गो गोविंदा
ओह माय गॉड या चित्रपटातील सोनाक्षी सिन्हा आणि प्रभुदेवा यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले गो गो गो गोविंदा हे गाणे चांगलेच फेमस आहे. या गाण्याचे संगीत, या गाण्यातील बोल आणि विशेष म्हणजे या गाण्यावर सोनाक्षी आणि प्रभुदेवा यांनी केलेले नृत्य अफतालून आहे.

आला रे आला गोविंदा आला
काला बाजार या चित्रपटातील आला रे आला गोविंदा आला हे गाणे अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यात त्या दोघांनी खूपच चांगले नृत्य सादर केले आहे. 

Web Title: Dahi Handi 2019: Apart from these songs, there is insufficient Gokulasthami celebrity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.