Coronavirus Pandemic: आणखी एका बहुप्रतिक्षित सिनेमाचे शूटिंग झाले रद्द, वाचा सविस्तर !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 09:37 AM2020-03-14T09:37:07+5:302020-03-14T09:41:19+5:30

अजय देवगण अभिनीत तान्हाजी -द अनसंग वॉरियर चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतचा आगामी सिनेमा कार्तिकने साईन केला आहे.

Coronavirus Pandemic Kartik Aaryan and Kiara Advani Bhool Bhulaiyaa 2 Movie Postponed-SRJ | Coronavirus Pandemic: आणखी एका बहुप्रतिक्षित सिनेमाचे शूटिंग झाले रद्द, वाचा सविस्तर !

Coronavirus Pandemic: आणखी एका बहुप्रतिक्षित सिनेमाचे शूटिंग झाले रद्द, वाचा सविस्तर !

googlenewsNext

कोरोना व्हायरसमुळे खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमाची शूटिंग आणि प्रमोशनही काहीकाळ थांबवण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसचा दिवसेंदिवस वाढत असणा-या  धोका पाहत बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित सिनेमांच्या तारखांसह काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि अजय देवगण स्टारर आगामी सिनेमा सूर्यवंशी ही कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे. येत्या 24 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार होता मात्र आता त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.


 याच पाठोपाठ आता  कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी  ‘भूल भुलैया 2’ ची शूटिंगही रद्द करण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सिनेमाच्या शूटिंगसाठी स्टारकास्ट लखनऊ येथे पोहचले होते.10 मार्चलाच सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करण्यात आली होती.  15 एप्रिलपर्यंत शूटिंगचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाच्या भीतीमुळे या सिनेमाचे शूटिंग मध्येच थांबवण्यात आले आहे. संपूर्ण सिनेमाची टीम मुंबईत परतली असून काही काळासाठी कोणत्याही प्रकारचे सिनेमाचे काम होणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. 


अजय देवगण अभिनीत तान्हाजी -द अनसंग वॉरियर चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतचा आगामी सिनेमा कार्तिकने साईन केला आहे.पहिल्यांदाच कार्तिक आर्यन रोमँटिक व चॉकलेटी हिरोच्या भूमिकेतून बाहेर पडल अॅक्शन चित्रपटात नशीब आजमावताना दिसणार आहे.

Web Title: Coronavirus Pandemic Kartik Aaryan and Kiara Advani Bhool Bhulaiyaa 2 Movie Postponed-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.