CoronaVirus: Bollywood Artist's New Song to Corona Background, Watch This Video TJL | CoronaVirus: बॉलिवूड कलाकारांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवं गाणं, नक्की पहा हा व्हिडिओ

CoronaVirus: बॉलिवूड कलाकारांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवं गाणं, नक्की पहा हा व्हिडिओ

देशातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर रूप धारण करत आहे. आज देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारांच्या वर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन आहे. त्यामुळे सर्वजण आपल्या घरात आहेत. तसेच सेलिब्रेटीदेखील लॉकडाउनमुळे आपल्या घरी थांबले आहेत. त्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आपल्याला सोशल मीडियावर सेलिब्रेटींनी आपल्या चाहत्यांना आवाहन केले होते. तसेच कुणी रॅप साँग केले. मात्र आता बॉलिवूडच्या सेलिब्रेटींचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन गाणे दाखल झाले आहे. मुस्कुराएगा इंडिया असे या गाण्याचे बोल आहेत.

मुस्कुराएगा इंडिया या गाण्यासाठी अक्षय कुमारजॅकी भगनानी एकत्र आले आहेत. हे दोघे प्रस्तुतकर्ते असून जीत जायगा इंडिया गाण्याच्या माध्यमातून देशातील लोकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे.

याबद्दल अक्षय कुमार म्हणाला की, सध्या आपले जीवन थांबले आहे आणि या काळात या गाण्याच्या माध्यमातून लोकांना हेच सांगू इच्छितो आहे की सर्व काही सुरळीत होईल. बस आता फक्त कोविड 19च्या विरूद्ध एकजुट करायची आहे आणि मग पुन्हा मुस्कुराएगा इंडिया.

तर जॅकी भगनानीने सांगितले की, हे गाणं सर्व भारतीयांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. हे गाणं 1.3 बिलियन भारतीयांनी सजलेल्या आपल्या देशाच्या भावनेप्रती दिलेली छोटेसे ट्रिब्युट आहे. 

जीत जाएगा इंडिया हे गाणं विशाल मिश्राने गायले आहे आणि कौशल किशोर यांच्या लेखणीतून साकार झाले आहे. या गाण्यात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, तापसी पन्नू, विकी कौशल, भूमी पेडणेकर, कार्तिक आर्यन, क्रिती सेनॉन, आयुषमान खुराणा,  कियारा आडवाणी, राजकुमार राव, सिद्धार्थ मल्होत्रा, रकुलप्रीत सिंग, शिखर धवन, अनन्या पांडे व जॅकी भगनानी हे कलाकार पहायला मिळत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus: Bollywood Artist's New Song to Corona Background, Watch This Video TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.