रणवीर सिंगच्या 83मध्ये बॉलिवूडमधील या अभिनेत्याची एंट्री, नाव वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 12:01 PM2019-08-28T12:01:01+5:302019-08-28T12:04:12+5:30

सध्या बॉलिवूड स्टार रणवीर सिंग त्याचा आगामी 'सिनेमा 83'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

Boman irani joins ranveer singh on film 83 | रणवीर सिंगच्या 83मध्ये बॉलिवूडमधील या अभिनेत्याची एंट्री, नाव वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

रणवीर सिंगच्या 83मध्ये बॉलिवूडमधील या अभिनेत्याची एंट्री, नाव वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

googlenewsNext

सध्या बॉलिवूड स्टार रणवीर सिंग त्याचा आगामी 'सिनेमा 83'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटामध्ये तो भारताच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कपिल देव यांच्या भूमिकेसाठीही रणवीर प्रचंड मेहनत घेत आहे. एवढंच नाहीतर या भूमिकेसाठी त्याने आपल्या आवडत्या अनेक गोष्टींचा त्यागही केला आहे. रणवीरच्या या सिनेमात कलाकारांची फौज आहे यात आता आणखी एक नाव अॅड झाले आहे ते म्हणजे बोमन इराणीचे.

रणवीरने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली. लंडनमधील लॉर्ड्स मैदानावरचा फोटो शेअर केला आहे यात रणवीर सिंग, बोमन इराणी आणि दिग्दर्शक कबीर खान दिसायेत. या सिनेमात बोमन  समालोचकच्या भूमिकेत दिसणार आहे.  


या सिनेमात ती दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिका साकारणार आहे. लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता.

या चित्रपटात ताहिर राज भसीन सुनील गावस्करांच्या भूमिकेत, एमी ब्रिक बलविंदर संधूंच्या भूमिकेत, तमीळ अभिनेता जीवा कृष्णामचारी श्रीकांत यांच्या भूमिकेत, चिराग पाटील संदीप पाटील यांच्या भूमिकेत, आदिनाथ कोठारे दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत, धैर्य करवा रवी शास्त्री यांच्या भूमिकेत आणि साहिल खट्टर सैयद यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Web Title: Boman irani joins ranveer singh on film 83

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.