व्वा...! काय प्लॅन आहे...! त्यांना पॉर्न इंडस्ट्रीचा 'राजा' व्हायचं होतं! राज, शिल्पावर KRKचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 02:59 PM2021-07-21T14:59:39+5:302021-07-21T15:01:03+5:30

पोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी राज कुंद्राला मुख्य आरोपी ठरवले आहे. त्याला सध्या भायखळ्यातील तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

Bolywood Actor KRK makes fun of raj kundra and shilpa shetty pornography case arrest | व्वा...! काय प्लॅन आहे...! त्यांना पॉर्न इंडस्ट्रीचा 'राजा' व्हायचं होतं! राज, शिल्पावर KRKचा निशाणा

व्वा...! काय प्लॅन आहे...! त्यांना पॉर्न इंडस्ट्रीचा 'राजा' व्हायचं होतं! राज, शिल्पावर KRKचा निशाणा

Next

मुंबई - बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीचा पती बिझनेसमन राज कुंद्राला अश्लील फिल्म्स तयार करणे आणि त्या अ‍ॅपच्या माध्यमाने रिलीज करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यानंतर, त्याची जबरदस्त खिल्ली उडविला जात आहे. यातच आता कमाल राशिद खाननेही (Kamaal Rashid Khan) खुल्ली उडवत शिल्ला आणि राज कुंद्रा यांच्यावर निशाणा साधला आहे. (Bolywood Actor KRK makes fun of raj kundra and shilpa shetty pornography case arrest)

राज कुंद्रा-शिल्पा शेट्टीवर निशाणा -
कमाल राशिद खानने ट्विट केले आहे, की "मुंबई पोलिसांनी म्हटल्याप्रमाणे, राज कुंद्रा पॉर्न इंडस्ट्रीचा राजा बनण्याची  प्लॅनिंग करत होते. ते जगभरात पॉर्नचे लाइव्ह स्ट्रिमिंग करणार होते. व्वा...! काय प्लान आहे...! कुंद्रा भैय्या की जय हो...! शिल्पा भाभी की जय हो...!" कमाल राशिद खानच्या या ट्विटला अनेक लोक सपोर्ट करत असून राज कुंद्राला ट्रोल करत आहेत. एवढेच नाही, तर शिल्पा शेट्टीवरही टीका केली जात आहे. चाहते शिल्पावरही प्रचंड चिडले आहेत.

'मी अ‍ॅप बघितलंय, फार काही नव्हतं', पोर्न फिल्म्सच्या धंद्यात अडकलेल्या राज कुंद्राच्या सपोर्टला धावला मिका सिंग

23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी -
राज कुंद्राला न्यायालयाने 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी सोमवारी रात्री अटक करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातील एका बंगल्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला होता. तेथे अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासाचाच एक भाग म्हणून राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. 

डायमंड रिंगपासून ते बुर्ज खलीफात फ्लॅटपर्यंत, राज कुंद्रानं शिल्पाला दिले आहेत हे अत्यंत महागडे गिफ्ट्स

शिल्पाला या प्रकरणातील सारे काही माहीत, मॉडेलचा दावा -
पोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी राज कुंद्राला मुख्य आरोपी ठरवले आहे. त्याला सध्या भायखळ्यातील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. मात्र या प्रकरणात शिल्पा शेट्टीची काही भूमिका आहे, असे दिसत नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र मॉडेल सागरिका शोना सुमन हिने शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप करत, तिला या प्रकरणातील सारे काही माहीत असल्याचा दावा केला आहे. मॉडेल सागरिका शोना सुमन ही तीच आहे, जिने या प्रकरणात राज कुंद्राचा संबंध असल्याचा दावा केला होता.
 

English summary :
Bolywood Actor KRK makes fun of raj kundra and shilpa shetty pornography case arrest

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bolywood Actor KRK makes fun of raj kundra and shilpa shetty pornography case arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app