डायमंड रिंगपासून ते बुर्ज खलीफात फ्लॅटपर्यंत, राज कुंद्रानं शिल्पाला दिले आहेत हे अत्यंत महागडे गिफ्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 10:47 AM2021-07-20T10:47:52+5:302021-07-20T10:59:09+5:30

Raj Kundra : राज कुंद्राला सोमवारी रात्री अश्लील फिल्म्स तयार करणे आणि त्या अॅपवर टाकणे या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. राज कुंद्रा एक मोठा बिझनेसमन आहे आणि तो नेहमीच शिल्पाला महागडे गिफ्ट्स देत असतो. 20 कॅरेटच्या अंगठीपासून ते बुर्ज खलीफातील फ्लॅटपर्यंत राजने शिल्पाला अनेक महागडे गिफ्ट्स दिले आहेत. (Raj Kundra's 5 expensive gifts for wife shilpa shetty)

राज कुंद्राला सोमवारी रात्री अश्लील फिल्म्स तयार करणे आणि त्या अॅपवर टाकणे या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

20 कॅरेटची डायमंड रिंग - शिल्पा शेट्टी नेहमीच आपली डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना दिसते. राज कुंद्राने साखरपुड्यात शिल्पाला 20 कॅरेटची डायमंड रिंग घातली होती. या अंगठीची किंमत तीन कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

बुर्ज खलीफात फ्लॅट - शिल्पा शेट्टीला अॅनेव्हर्सरीनिमित्त राजकडून मोस्ट एक्सपेंसिव्ह गिफ्ट मिळाले होते. राजने पत्नी श‍िल्पाला दुबईतील बुर्ज खलीफातील 19वा फ्लॅट गिफ्ट केला होता. काही वृत्तांनुसार, 2016 मध्ये श‍िल्पाने अपली ही प्रॉपर्टी विकली.

यूकेत 7 बेडरूम व्हिला - राज कुंद्राने पत्नी शिल्पा शेट्टीसाठी आणखी एक महागडी प्रॉपर्टी विकत घेतली होती. त्याने यूकेमध्ये 'राज महल' नावाचा 7 बेडरूम असलेला एक आलीशान व्हिला विकत घेतला होता.

मुंबईत सी-फेसिंग व्हिला - म्हटले जाते, की मुंबईत आपला एक सी-फेसिंग व्हिला असावा, असे शिल्पाचे स्वप्न होते आणि तिचे हे स्वप्न पती राज कुंद्राने पूर्ण केले. त्याचे कुटुंब बहुतेक वेळ याच ठिकाणी घालवते. त्यांच्या या सी-फेसिंग व्हिलाचे नाव 'किनारा' असे आहे.

लक्झरी कार - राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला अनेक लक्झरी कार भेट म्हणून दिल्या आहेत. यात बीएमडब्ल्यू झेड 4 चाही समावेश आहे. शिल्पाची वाहनेही नेहमीच चर्चेत असतात.

खासगी आयुष्यावर बोलायचे झाल्यास, राज आणि शिल्पा यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत. मुलाचे नाव वियान तर मुलीचे नाव समीशा, असे आहे. राज आणि शिल्पा सोशल मिडियावरही मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतात.

आइसक्रीमचा आनंद घेताना राज कुंद्रा आणि शिप्ला शेट्टी

राज कुंद्रा आणि शिप्ला शेट्टी

सर्व फोटो - राज कुंद्रा इंस्टाग्राम