हॉलिवूड चित्रपट 'फ्रोजन २'चे हिंदी व्हर्जन २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील एना व एल्सा या फ्रोजन सिस्टर्सला हिंदीत प्रियंका चोप्रापरिणीती चोप्रा आवाज देणार आहेत. याबाबतची माहिती खुद्द प्रियंका चोप्राने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून दिली आहे. या चित्रपटात एनाला परिणीती आणि एल्साला प्रियंका आवाज देणार आहे. 


प्रियंकाने 'फ्रोजन २' चित्रपटाचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, मिमी आणि टिशा आता एल्सा आणि एना आहे, चोप्रा सिस्टर्स एकत्र येत आहेत डिज्नीच्या 'फ्रोजन२' मध्ये. आता आणखीन प्रतीक्षा करावी लागणार नाही आम्हाला पाहण्यासाठी. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की आम्हाला ऐकण्यासाठी, आम्ही घेऊन येत आहोत अनोखे आणि दमदार पात्रांचे जीवन हिंदीत. फ्रोजन २ येणार २२ नोव्हेंबरला.

या निमित्ताने बोलताना अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनस म्हणाली की, ''एल्सा ही एक नाट्यमय व्यक्तिरेखा असून तिची मते ठाम आहेत आणि ती संतुलित विचार करणारी आहे. ही माझ्या स्वभावाची वैशिष्टे आहेत. मला याचमुळे या फिल्मचा भाग बनावेसे वाटले, शिवाय आमच्या स्थानिक प्रेक्षकांना सर्वांत यशस्वी एनिमेटेड फिल्म्सपैकी एक दाखवण्याची सुंदर संधी मिळणार आहे. परिणिती एनाच्या व्यक्तिरेखेला आपला आवाज देणार आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला आहे. आम्ही दोघींनी यापूर्वी एकत्र काम केलेले नाही आणि एकत्र येण्यासाठी हा एक उत्तम सिनेमा आहे. त्यामुळे मला अविस्मरणीय आठवणी मिळणार आहेत.''

या घोषणेबाबत बोलताना अभिनेत्री परिणिती चोप्रा म्हणाली की, ''डिस्नेची राजकुमारी होण्याचे स्वप्न पाहण्यासाठी तुम्हाला अभिनेत्रीच व्हायला पाहिजे असे नाही. मला पहिला चित्रपट खूप आवडला. तो माझा आवडता एनिमेशन चित्रपट आहे. पण मला एनाला आवाज देण्याची संधी मिळेल असे वाटले नव्हते. अर्थातच, माझ्या खऱ्या आयुष्यातल्या बहिणीसोबत बहिणींबाबतचा चित्रपट करायला मिळतोय ही खूप आनंदाची गोष्ट आहे. डबिंग करत असताना खऱ्या आयुष्यातही आम्ही आमच्या व्यक्तिरेखांसारख्या आहोत हे जाणवून हसत राहू. मिमी दिदी ही खरोखरंच एल्सासारखी आहे आणि मी एनासारखी आहे. याचमुळे हा चित्रपट खूपच खास आहे. मला प्रेक्षकांच्या प्रतिसादाची उत्सुकता आहे.''


'फ्रोजन' सीरिजमधील हा चौथा चित्रपट आहे. फ्रोजन २ चित्रपटात स्नो क्वीन एल्सा आणि तिच्या बहिणीची कथा आहे. ज्यात ती आपल्या किंगडम एरेंडलमधून दूर जाते.

यादरम्यान त्यांच्यासोबत क्रिस्टॉफ, ओलफ व स्वेन असतात. या चित्रपटाचे दिग्दर्शन जेनिफल ली आणि क्रिस बकने केले आहे. या चित्रपटाच्या इंग्रजी व्हर्जनला एल्साला इडिना मेन्जेल व एनाला क्रिस्टेन बेलने आवाज दिला आहे.

हा फ्रोजन सीरिजचा चौथा चित्रपट आहे.

 


Web Title: Bollywood Sisters will give voice to 'Frozen Sisters'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.