Pornography Case: राज कुंद्राशी संबंधित पॉर्न रॅकेट प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या भूमिकेबाबत मोठा खुलासा; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 11:55 AM2021-07-27T11:55:41+5:302021-07-27T11:56:57+5:30

शिल्पाने म्हटले आहे, की इरॉटिका, पॉर्नपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. एवढेच नाही, तर आपला पती राज कुंद्राचा पॉर्न फिल्म्सशी काहीही संबंध नाही, असा दावाही शिल्पाने केला आहे. 

Bollywood Shilpa shetty role in raj kundra pornography case here is a big alert | Pornography Case: राज कुंद्राशी संबंधित पॉर्न रॅकेट प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या भूमिकेबाबत मोठा खुलासा; जाणून घ्या

Pornography Case: राज कुंद्राशी संबंधित पॉर्न रॅकेट प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या भूमिकेबाबत मोठा खुलासा; जाणून घ्या

Next


मुंबई - पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा पॉर्न ग्राफी प्रकरणात चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टीची कसल्याही प्रकारची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. सांगण्यात येते, की आरोपी आणि साक्षिदारांच्या चौकशीतही अद्याप शिल्पा शेट्टीचे नाव समोर आलेले नाही. मात्र, 2020 मध्ये शिल्पा शेट्टीने वियान कंपनीचा राजीनामा का दिला होता? याचा पोलीस तपास करत आहेत. (Bollywood Shilpa shetty role in raj kundra pornography case here is a big alert)

वियान कंपनीतून पोर्नोग्राफीचा काळा धंदा सुरू होता. त्यामुळे अद्याप शिल्पाला क्लीन चीट नाही. याच बरोबर, राज कुंद्राने शिप्लाच्या खात्यावरूनही पैशांचा व्यवहार केला आहे, की याचाही तपास पोलीस करत आहेत. मात्र, आतापर्यंतच्या चौकशीत पोलिसांना शिल्पाचा रोल कुठेही दिसून आलेला नाही.

शिल्पा शेट्टीही घेणार होती राज कुंद्रापासून घटस्फोट? मेसेज करुन आईला सांगितले होते कारण

बॉलीवुड अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन  राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात सातत्याने नव-नवे खुलासे समोर येत आहेत. पोलीस सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, शिल्पाने दावा केला आहे, की 'हॉटशॉट्स'साठी तयार करण्यात आलेल्या कंटेंटसंदर्भात तिला काहीही माहीत नव्हते. हॉटशॉट्स एक  मोबाइल अॅप होते. यावर अश्लिल विडिओ स्ट्रिमिंग करण्याचा आरोप राज कुंद्रावर आहे.

तत्पूर्वी, शिल्पाने म्हटले आहे, की इरॉटिका, पॉर्नपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. एवढेच नाही, तर आपला पती राज कुंद्राचा पॉर्न फिल्म्सशी काहीही संबंध नाही, असा दावाही शिल्पाने केला आहे. 

Raj Kundra Case: पोलिसांच्या रेडदरम्यान रडली होती शिल्पा शेट्टी; राज कुंद्रासोबतही झाला होता वाद!

या प्रकरणात राज कुंद्रासह एकूण 11 जणांना 19 जुलैला मुंबई पोलिसांनी पॉर्न फिल्म्सच्या व्यवसायाशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सांगण्यात येते, की या व्यवसायात राज कुंद्राने मोठा पैसा लावला होता आणि यातून तो मोठा नफाही कमवत होता. 


 

Web Title: Bollywood Shilpa shetty role in raj kundra pornography case here is a big alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app