Bollywood Drugs Connection: Arjun Rampal to be fired by NCB for Investigation again! | बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन : अर्जुन रामपालला एनसीबी पुन्हा चाैकशीसाठी बाेलाविणार!

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन : अर्जुन रामपालला एनसीबी पुन्हा चाैकशीसाठी बाेलाविणार!

मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) रडारवर असलेल्या अभिनेता अर्जुन रामपाल याला लवकरच चौकशीसाठी पुन्हा बाेलाविण्यात येणार असल्याचे एनसीबीतील सूत्रांनी सांगितले.

मागच्या आठवड्यात एनसीबीने अर्जुन रामपालची बहीण कोमल रामपालकडे कसून चौकशी केली. त्यामध्ये अनेक संशयास्पद माहिती समोर आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बॉलिवूडचे ड्रग्ज रॅकेट चव्हाट्यावर आले. त्यातून आतापर्यंत एनसीबीने गेल्या चार, साडेचार महिन्यांत सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक याच्यासह ४० हून अधिक तस्करांना अटक केली. 

नोव्हेंबरमध्ये अर्जुन रामपालच्या वांद्रे येथील घरावर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी त्याच्याकडे प्रतिबंधित औषधे सापडली होती. त्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन त्याने एनसीबी अधिकाऱ्यांना दाखविले. मात्र, ते जुने असल्याचे एनसीबीच्या तपासात पुढे आले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bollywood Drugs Connection: Arjun Rampal to be fired by NCB for Investigation again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.