ठळक मुद्देराखी सावंतकडे 30 करोड रुपये असल्याचे म्हटले जाते आणि ही संपत्ती वडिलोपार्जित नसून तिने स्वतः कमवलेली आहे. राखीचे मुंबईत एक नव्हे तर दोन फ्लॅट आहेत. त्या दोन्ही फ्लॅटची किंमत 11 करोड रुपयांपेक्षा अधिक असल्याचे म्हटले जाते.

राखी सावंतचा आज वाढदिवस असून तिचे खरे नाव नीरू सावंत आहे. राखीला कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून ओळखले जाते. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रोव्हर्सीत अडकली असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. राखीने जिस देश में गंगा रहता है, मैं हूँ ना, दम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण ती कधीच महत्त्वाच्या भूमिकेत झळकली नाही. बिग बॉस या कार्यक्रमात देखील तिने हजेरी लावली होती. तिला खरी लोकप्रियता बिग बॉस, नच बलिये, राखी का स्वयंवर यांसारख्या कार्यक्रमांमुळे मिळाली. राखीला बॉलिवूडमध्ये आयटम गर्ल म्हणून ओळखले जाते.

राखीची गणना बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होत नसली तरी राखीकडे आज कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीइतकाच पैसा आहे. राखी सावंतकडे 30 करोड रुपये असल्याचे म्हटले जाते आणि ही संपत्ती वडिलोपार्जित नसून तिने स्वतः कमवलेली आहे. राखीचे मुंबईत एक नव्हे तर दोन फ्लॅट आहेत. त्या दोन्ही फ्लॅटची किंमत 11 करोड रुपयांपेक्षा अधिक असल्याचे म्हटले जाते. एवढेच नव्हे तर राखीकडे महागड्या गाड्या देखील आहेत. राखीकडे फॉर्स एंडेवर ही कार असून त्याची किंमत 21.6 लाख रुपये आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून राखी सावंत तिच्या सीक्रेट मॅरेजला घेऊन चर्चेत आहे. करवा चौथच्या दिवशी राखीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओत ती गाजराचा हलवा बनवताना दिसली होती. मी युकेत आहे आणि घरी गाजराचा हलवा बनवतेय, असा दावा राखीने या व्हिडीओत केला होता. यावरून राखीला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले होते. 

Web Title: Bollywood Drama Queen Rakhi Sawant Net Worth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.